घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

ऐसा आपणचि केवळु । होऊनि असे निखळु । तयाची प्रज्ञा अचळु । निभ्रांत मानीं ॥
अशा प्रकारे जो आपण स्वतःच सर्वरूप होऊन राहतो, तो अचलप्रज्ञ (स्थिरबुद्धि) असे निःसंशय समज.
देखैं अखंडित प्रसन्नता । आथी जेथ चित्ता । तेथ रिगणें नाहीं समस्तां । संसारदु:खां ॥
असे पाहा की, ज्याचे मन पूर्ण शांत आहे, त्याच्या मनात या सर्व संसारदु:खाचा प्रवेश होत नाही.
जैसा अमृताचा निर्झरु । प्रसवे जयाचा जठरु । तया क्षुधेतृषेचा अडदरु । कहींचि नाहीं ॥
ज्याचे उदरातच अमृताचा झरा उत्पन्न झाला आहे, त्याला जशी तहानभुकेची पीडा कधीच होत नाही,
तैसें हृदय प्रसन्न होये । तरी दु:ख कैचें कें आहे?। तेथ आपैसी बुद्धि राहे । परमात्मरूपीं ॥
त्याप्रमाणे ज्याचे हृदय प्रसन्न आहे, त्याला दुःख कसले! आणि ते होणार तरी कोठून! त्याची बुद्धि आपोआप परमात्मस्वरूपी जडून राहते;
जैसा निर्वातींचा दीपु । सर्वथा नेणें कंपु । तैसा स्थिरबुद्धि स्वस्वरूपु । योगयुक्तु ॥
ज्याप्रमाणे, निवार्‍यातील दिव्याची ज्योत कधीही हालत नाही, त्याप्रमाणे जो स्थिरबुद्धि आहे, तो आत्मस्वरूप समाधीमध्ये एकाग्र असतो.
ये युक्तीची कडसणी । नाहीं जयाच्या अंत:करणीं । तो आकळिला जाणैं गुणीं । विषयादिकीं ॥
हा योगबुद्धीचा विचार ज्याच्या अंत:करणात नाही, त्याला शब्दादिक विषय आपल्या पाशात गोवून घेतात.
तया स्थिरबुद्धि पार्था । कहीं नाहीं सर्वथा । आणि स्थैर्याची आस्था । तेही नुपजे ॥
पार्था, त्याच्या बुद्धीला कधीही स्थिरता नसते व तिच्या प्राप्तीविषयी त्याच्या अंतःकरणात इच्छाही उत्पन्न होत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -