घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

तो उद्देशु तूं नेणसीचि । म्हणौनि क्षोभलासि वायांचि । तरी आतां जाणें म्यांचि । उक्त दोन्ही ॥
तो आमचा हेतु तू जाणत नाहीस, म्हणून व्यर्थ रागावलास; तेव्हा आता हे ध्यानात ठेव की, ज्ञानयोग आणि कर्मयोग हे दोन्ही मार्ग मीच सांगितलेले आहेत.
अवधारीं वीरश्रेष्ठा । ये लोकीं या दोन्ही निष्ठा । मजचिपासूनि प्रगटा । अनादिसिद्धा ॥
वीरश्रेष्ठा, ऐक; या पृथ्वीवर हे दोन्ही संप्रदाय माझ्यापासून पूर्वापार प्रकट झाले आहेत.
एक ज्ञानयोगु म्हणिजे । जो सांख्यीं अनुष्ठिजे । जेथ वोळखीसवें पाविजे । तद्रूपता ॥
जड चैतन्याचा विचार करणारे ज्याचे आचरण करितात व ज्यायोगाने ब्रह्मरूपाची ओळख होताक्षणीच ते तद्रूप होऊन जातात, त्या एका संप्रदायाला ज्ञानयोग म्हणतात,
एकु कर्मयोगु जाण । जेथ साधकजन निपुण । होऊनियां निर्वाण । पावती वेळे ॥
दुसर्‍यास कर्मयोग म्हणतात. त्या योगात तत्पर असे मुमुक्षुजन अवकाशाने (ज्ञानोत्तरकाली) मोक्षास पावतात.
हे मार्गु तरी दोनी । परी एकवटती निदानीं । जैसी सिद्धसाध्यभोजेनीं । तृप्ती एक ॥
तयार असलेल्या व तयार करून घेतलेल्या अन्नाच्या भोजनापासून जशी सारखीच तृप्ती होते, तसे हे मार्ग तर दोन आहेत, पण ते परिणामी एकरूप होतात.
कां पूर्वापर सरितां । भिन्न दिसती पाहतां । मग सिंधुमिळणीं ऐक्यता । पावती शेखीं ॥
किंवा पूर्व, पश्चिम दिशाकडे जाणार्‍या नद्या पाहिल्या तर भिन्न दिसतात, परंतु समुद्रात मिळण्याचे वेळी अखेरीस त्या जशा एकत्र होतात,
तैसीं दोनीही मतें । सूचिती एका कारणातें । परी उपास्ति ते योग्यते । आधीन असे ॥
तशी ही दोन्ही मते एकाच तत्वाची सूचक आहेत; परंतु त्यांची उपासना उपासकाच्या योग्यतेवर अवलंबून आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -