घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

जंव निरार्तता नाहीं । तंव व्यापारू असे पाहीं । मग संतुष्टीच्या ठायीं । कुंठे सहजें ॥
जोपर्यंत निरिच्छता प्राप्त झाली नाही, तोपर्यंत खटपट ही आहेच; तीच प्राप्त झाली म्हणजे आत्मसंतोष होऊन खटपट साहजिकच थांबते.
म्हणौनि आइकें पार्था । जयां नैष्कर्म्यपदीं आस्था । तया उचित कर्म सर्वथा । त्याज्य नोहे ॥
म्हणून पार्था, ज्याला परमात्मप्राप्तीची इच्छा आहे, त्याला विहित कर्माचरण कधीही सोडता येत नाही;
आणि आपुलिये चाडे। आपादिलें हें मांडे । कीं त्यजिलें कर्म सांडे । ऐसें आहे?॥
आणि दुसरे असे की, आपल्या इच्छेनेच कर्माचा स्वीकार व त्याग करू म्हटल्याने तो होईल काय?
हें वायांचि सैरा बोलिजे । उकलु तरी देखोनि पाहिजे । परी त्यजितां कर्म न त्यजे । निभ्रांत मानीं ॥
हे बोलणे विचारहीन आहे. याचा नीट विचार करून पाहिला तर नुसते कर्म टाकल्याने कर्माचा त्याग होत नाही, असे पक्के समज.
सगळे जंव प्रकृतीचें अधिष्ठान । तंव सांडी मांडी हें अज्ञान । जे चेष्टा ते गुणाधीन । आपैसी असे ॥
जोपर्यंत आपण मायेच्या आधीन आहोत, तोपर्यंत मायेच्या सत्वादी गुणांच्या आधीन सर्व व्यापार असतात; म्हणून कर्म स्वीकारणे अगर टाकणे व तसे बोलणे अज्ञानीपणाचे लक्षण आहे.
देखैं विहित कर्म जेतुलें । तें सगळें जरी वोसंडिलें । तरी स्वभाव काय निमाले । इंद्रियांचे ॥
असे पहा की विहित कर्माचा आरंभ कर्त्याचे इच्छेवर अवलंबून आहे, म्हणून द्वेषाने किंवा त्रासाने जरी त्याग केला तरी स्वाभाविक कर्म उत्पन्न करण्याचे इंद्रियाचे धर्म नष्ट होतील काय?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -