घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

सांगैं श्रवणीं ऐकावें ठेलें? । कीं नेत्रींचें तेज गेलें? । हें नासारंध्र बुझालें । परिमळु नेघे?॥
सांग पाहू; विहित कर्मत्याग केला म्हणून कानाचे ऐकणे बंद झाले? का डोळ्यांची दृष्टी गेली? का नाकाची भोके बुजून वास येईनासा झाला?
ना तरी प्राणापानगति । कीं निर्विकल्प जाहली मती । कीं क्षुधातृषादि आर्ति । खुंटलिया? ॥
किंवा प्राणापानवायूची गती बंद झाली? का मन कल्पनारहित झाले? अथवा भूकतहानेची इच्छा नाहीशी झाली?
हे स्वप्नावबोधु ठेले । कीं चरण चालों विसरले । हें असो काय निमाले । जन्ममृत्यू? ॥
का स्वप्न व जागृती अवस्था बंद झाल्या? किंवा पाय चालणे विसरले? इतकेच नव्हे, तर जन्ममरण चुकले आहे काय?
हें नठकेचि जरी कांहीं । तरी सांडिलें तें कायी । म्हणौनि कर्मत्यागु नाहीं । प्रकृतिमंता ॥
मग हे इंद्रियाचे व्यापार जर बंद राहत नाहीत, तर मग सोडले ते काय? म्हणून देहाभिमान्याकडून कर्मत्याग कधीही होणार नाही.
कर्म पराधीनपणें । निपजतसे प्रकृतिगुणें । येरी धरीं मोकलीं अंत:करणें । वाहिजे वायां ॥
कर्म हें पराधीनपणाने प्रकृतीच्या गुणामुळे होत असते, म्हणून मी कर्म करीन अगर सोडीन असे समजणे व्यर्थ आहे.
देखैं रथीं आरूढिजे । मग जरी निश्चळा बैसिजे । तरी चळु होऊनि हिंडिजे । परतंत्रा ॥
पहा की, रथात बसल्यावर मग जरी स्तब्ध बसून राहिले, तरी तो रथाच्या अधीन असल्यामुळे रथाचे फिरणे म्हणजे रथात बसण्याचे फिरणे असे होते.
कां उचलिलें वायुवशें । चळे शुष्क पत्र जैसें । निचेष्ट आकाशें । परिभ्रमे ॥
किंवा झाडाचे वाळलेले पान निश्चेष्ट असताही ज्याप्रमाणे वायूच्या वेगाने उडून आकाशात भ्रमण करिते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -