Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर संपादकीय वाणी संतांची वाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

अहेतुकें चित्तें । अनुष्ठा पां ययातें । पतिव्रता पतीतें । जियापरी ॥
ज्याप्रमाणे आपल्या पतीची सेवा पतिव्रता निष्काम बुद्धीने करिते, त्याप्रमाणे तुम्ही आपल्या स्वधर्माचे निष्काम बुद्धीने आचरण करा.
तैसा स्वधर्मरूप मखु । हाचि सेव्यु तुम्हां एकु । ऐसें सत्यलोकनायकु । बोलता जाहला ॥
ब्रह्मदेव म्हणाले, ‘स्वधर्माचे आचरण हाच एक तुमचा यज्ञ होय, म्हणून तोच एक तुम्हाला आचरण करण्यास योग्य आहे.’
देखा स्वधर्मातें भजाल । तरी कामधेनु हा होईल । मग प्रजाहो न संडील । तुमतें कदा ॥
‘जनहो, असे पहा की, तुम्ही जर स्वधर्माने वागाल, तर तो कामधेनूसारखा फलद्रूप होऊन तुम्हाला कधीही अंतर देणार नाही.’
जैं येणेंकरूनि समस्तां । परितोषु होईल देवतां । मग ते तुम्हां ईप्सिता । अर्थांतें देती ॥
या स्वधर्माच्या आचरणाने सर्व देवता संतोष पावतील आणि मग त्या तुम्हाला इच्छित फळ देतील.
या स्वधर्मपूजा पूजितां । देवतागणां समस्तां । योगक्षेमु निश्चिता । करिती तुमचा ॥
अशा रीतीने स्वधर्माचरणरूप पूजेने सर्व देवतागणाचे पूजन केले असता त्या तुम्हाला अप्राप्य वस्तूची प्राप्ती करून देऊन प्राप्त वस्तूचे संरक्षण निःसंशय करतील.
तुम्ही देवांतें भजाल । देव तुम्हां तुष्टतील । ऐसी परस्परें घडेल । प्रीति जेथ ॥
तुम्ही देवाना भजाल तर देवही तुम्हावर संतुष्ट होतील; आणि अशा प्रकारे एकमेकांचे एकमेकांवर जेव्हा प्रेम जडेल,
तेथ तुम्ही जें करूं म्हणाल । तें आपैसें सिद्धी जाईल । वांच्छिही पुरेल । मानसींचे ॥
जेव्हा तुम्ही जे करू म्हणाल ते सहज सिद्धिस जाईल आणि तुमच्या मनातील सर्व वासना पूर्ण होतील.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -