घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

तैसीं त्रिभुवनींची दु:खें । आणि नानाविधें पातकें । दैन्यजात तितुकें । तेथेंचि वसे ॥
तसेच त्रिभुवनातील सर्व दुःखे आणि हजारो प्रकारची पातके आणि झाडून सर्व दारिद्य्रही त्याचे ठिकाणी वास करितात.
ऐसें होय तया उन्मत्ता । मग न सुटे बापा रुदतां । कल्पांतींही सर्वथा । प्राणिगणहो ॥
जनहो, याप्रमाणे त्या उन्मत्त मनुष्याची स्थिती होते आणि अशा दुःखात प्राणी रडू लागले तरी त्यांना कल्पातीलही दुःखे सोडीत नाहीत.
म्हणौनि निजवृत्ती हे न संडावी । इंद्रिये बरळों नेदावीं । ऐसें प्रजांतें शिकवी । चतुराननु ॥
ब्रह्मदेव प्रजेला असा बोध करितात की, म्हणून आपला स्वधर्म सोडू नका आणि इंद्रियांना स्वैर वर्तन करू देऊ नका.
जैसें जळचरा जळ सांडे । आणि तत्क्षणीं मरण मांडे । हा स्वधर्मु तेणें पाडें । विसंबों नये ॥
ज्याप्रमाणे माशाला पाण्यातून बाहेर काढल्याबरोबर लागलीच मृत्यू येतो, त्याप्रमाणे तुमची स्थिती होईल. म्हणून तुम्ही स्वधर्म विसरू नका.
म्हणौनि तुम्हीं समस्तीं । आपुलालिया कर्मीं उचितीं । निरत व्हावें पुढतपुढती । म्हणिपत असे ॥
ब्रह्मदेव म्हणतो- ‘म्हणून तुम्ही सर्वांनी आपापले उचित कर्म आचरण्याविषयी नेहमी तयार राहावे.’
देखा विहित क्रियाविधि । निर्हेतुका बुद्धी । जो असतिये समृद्धि । विनियोगु करी ॥
हे पहा, ‘जो विहित कर्माचे निष्काम बुद्धीने आचरण करण्यामध्ये असलेल्या संपत्तीचा विनियोग करितो,
गुरु गोत्र अग्नि पूजी । अवसरीं भजे द्विजीं । निमित्तादिकीं यजी । पितरोद्देशें ॥
आपले गुरू, आप्त व अग्नी यांची पूजा करितो आणि यथाकाली ब्राह्मणांची सेवा करितो व आपल्या पितरांच्या उद्देशाने जो पर्वकाळी त्यांचे पूजन करितो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -