घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

या यज्ञक्रिया उचिता । यज्ञेशीं हवन करितां । हुतशेष स्वभावत: । उरे जें जें ॥
आणि याप्रमाणे विहित कर्माचरण व पंचमहायज्ञादी करून जे यज्ञशेष बाकी राहील,
तें सुखें आपुले घरीं । कुटुंबेंसी भोजन करी । कीं भोग्यचि तें निवारी । कल्मषातें ॥
ते सुखाने आपण कुटुंबासह सेवन करितो, त्याच्या सर्व पातकांचा त्या यज्ञशेषसेवनानेच नाश होतो.
तें यज्ञावशिष्ट भोगी । म्हणौनि सांडिजे तो अघीं । जयापरी महारोगी । अमृतसिद्धि ॥
अमृताचे सेवन केल्यामुळे ज्याप्रमाणे महारोगाचा नाश होतो, त्याप्रमाणे यज्ञावशिष्ट अन्नाचे सेवन केल्याने पातके त्याला सोडून जातात.
कां तत्त्वनिष्ठु जैसा । नागवे भ्रांतिलेशा । तो शेषभोगी तैसा । नाकळे दोषा ॥
ज्याप्रमाणे ब्रह्मनिष्ठाला यतकिंचितही भ्रांती होत नाही, त्याप्रमाणे यज्ञ करून शेष राहिलेल्या अन्नाचे सेवन करणार्‍याला दोष लागत नाहीत,
म्हणौनि स्वधर्में जें अर्जे । तें स्वधर्मेंचि विनियोगिजे । मग उरे तें भोगिजे । संतोषेंसीं ॥
म्हणून स्वधर्माने संपादन केलेले द्रव्य स्वधर्मानेच खर्चावे आणि बाकी राहील त्याचा संतोषाने उपभोग घ्यावा.
हें वांचूनि पार्था । राहाटों नये अन्यथा । ऐसी आद्य हे कथा । श्रीमुरारी सांगे ॥
भगवान श्रीकृष्ण सांगतात, पार्था अशी ही आद्यस्थिती आहे; याशिवाय मनुष्याने अन्य मार्गाने वागू नये.
जे देहचि आपणपें मानिती । आणि विषयांतें भोग्य म्हणती । यापरतें न स्मरती । आणिक कांहीं ॥
जे पुरुष आपल्या शरीरासच आत्मा असे मानतात, विषयाचे सेवन हीच भोग्यवस्तु असे मानून त्याशिवाय दुसरे काही जाणत नाहीत,
हें यज्ञोपकरण सकळ । नेणतसां ते बरळ । अहंबुद्धी केवळ । भोगूं पाहती ॥
हे सर्व साहित्य यज्ञसंबंधी आहे, हे न जाणून जे भ्रमात असतात आणि अहंकारबुद्धीने फक्त विषयोपभोगावरच ज्यांची दृष्टी असते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -