घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

इंद्रियरुचीसारिखें । करविती पाक निक े। ते पापिये पातक ें। सेविती जाण ॥
जे आपणास आवडणारी उत्तम पक्वान्ने तयार करून आपणच त्यांचे सेवन करतात, ते पापी असून पातकांचेच सेवन करतात, असे जाण.
संपत्तिजात आघवें । हें हवनद्रव्य मानावें । मग स्वधर्मयज्ञें अर्पावें । आदिपुरुषीं ॥
ही सर्व संपत्ती स्वधर्मरूप यज्ञाचे हवनद्रव्य आहे, असे समजून ती स्वधर्मयज्ञानेच परमेश्वरास अर्पण करावी.
हें सांडोनियां मूर्ख । आपणपेंयालागीं देख । निपजविती पाक । नानाविध ॥
हे सर्व सोडून, मूर्ख लोक आपल्या करिताच नानाप्रकारचे पदार्थ तयार करवितात.
जिहीं यज्ञु सिद्धी जाये । परेषा तोषु होये । तें हें सामान्य अन्न न होये । म्हणौनियां ॥
ज्या अन्नापासून यज्ञाची सिद्धी होते आणि ईश्वर संतुष्ट होतो, ते हे अन्न सामान्य नाही; म्हणून
हें न म्हणावें साधारण । अन्न ब्रह्मरूप जाण । जें जीवनहेतु कारण । विश्वा यया ॥
या अन्नाला साधारण असे न समजता ते ब्रह्मरूप आहे, असे समज. कारण सर्व जगाचे हे जीवित होय.
अन्नास्तव भूतें । प्ररोहो पावती समस्तें । मग पर्जन्यु या अन्नातें । सर्वत्र प्रसवे ॥
अन्नापासून प्राणिमात्रांची उत्पत्ती होते आणि पर्जन्यापासून सर्व ठिकाणी अन्न उत्पन्न होते;
तया पर्जन्या यज्ञीं जन्म । यज्ञातें प्रगटी कर्म । कर्मासि आदि ब्रह्म । वेदरूप ॥
त्या पर्जन्याची उत्पत्ती यज्ञापासून आणि यज्ञाची उत्पत्ती कर्मापासून होते. कर्माची उत्पत्ती वेदरूप ब्रह्मापासून,
तया वेदांतें परात्पर । प्रसवतसे अक्षर । म्हणौनि हें चराचर । ब्रह्मबद्ध ॥
आणि त्या वेदाची उत्पत्ती परमात्म्यापासून होते; म्हणून हे सर्व जगत् ब्रह्माधीन आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -