Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर संपादकीय वाणी संतांची वाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

तेथें सत्क्रियाचि लावावी । तेचि एकी प्रशंसावी । नैष्कर्मींही दावावी । आचरोनी ॥
त्याला सत्कर्माचेच आचरण करण्यास लावावे. सत्कर्माचीच प्रशंसा करावी आणि निष्काम झालेल्या पुरुषांनीही सत्कर्म आचरण करून दाखवावे.
तया लोकसंग्रहालागीं । वर्ततां कर्मसंगीं । तो कर्मबंधु आंगीं । वाजैलना ॥
वर्णाश्रमधर्मरक्षणाकरिता कर्ममार्गाचे आचरण करीत असता त्यांना कर्मबंध भोगावा लागणार नाही.
जैसी बहुरूपियांची रावो राणी । स्त्रीपुरुषभावो नाहीं मनीं । परी लोकसंपादणी । तैशीच करिती ॥
बहुरूप्यांनी जरी राजाराणीची सोंगे घेतली, तरी त्यांच्या मनात स्त्रीपुरुषभाव मुळीच नसतो; पण लोकांना दाखविण्याकरिता ते तसेच वागतात.
देखैं पुढिलाचें वोझें । जरी आपुलां माथां घेइजे । तरी सांगें कां न दाटिजे धनुर्धरा? ॥
आता तीच कर्मे अज्ञानास कशी बाधक होतात असे म्हणशील तर अर्जुना, असे पहा की, दुसर्‍यांचे ओझे आपल्या डोक्यावर जर घेतले तर आपली मान अवघडणार नाही का सांग बरे?
तैशी शुभाशुभें कर्में । जियें निपजती प्रकृतिधर्में । तियें मूर्ख मतिभ्रमें । मी कर्ता म्हणे ॥
त्याचप्रमाणे प्रकृतीच्या गुणांमुळे जी बरी वाईट कर्मे उत्पन्न होतात, त्यांचा कर्ता मीच आहे असे अज्ञ मनुष्य भ्रमाने म्हणतो.
ऐसा अहंकारादि रूढ । एकदेशी मूढ । तया हा परमार्थ गूढ । प्रगटावा ना ॥
अशा रीतीने साडेतीन हात देहाचाच अभिमान धारण करणार्‍या पुरुषाला हा नैष्कर्म स्थितीचा परमार्थ प्रकट करू नये.
हें असो प्रस्तुत । सांगिजैल तुज हित । तें अर्जुना देऊनि चित्त । अवधारीं पां ॥
(कारण अनधिकारामुळे परमार्थ तत्त्व कळणार नाही आणि तो कर्मापासूनही भ्रष्ट होईल,) असो. अर्जुना, हे राहू दे. प्रस्तुत तुझे हित कशात आहे, ते तुला सांगतो, लक्ष देऊन ऐक.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -