घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

तुवां शरीरपरा नोहावें । कामनाजात सांडावें । मग अवसरोचित भोगावे । भोग सकळ ॥
तू शरीराच्या स्वाधीन न होता सर्व इच्छा सोडून दे आणि मग सकल भोग यथाकाली भोग.
आतां कोदंड घेऊनि हातीं । आरूढ पां इये रथीं । देईं आलिंगन वीरवृत्ती । समाधानें ॥
एवढ्याकरिता आता हातात धनुष्य घेऊन या रथावर बैस आणि आनंदाने वीरवृत्तीचा स्वीकार कर.
जगीं कीर्ति रुढवीं । स्वधर्माचा मानु वाढवीं । इया भारापासोनि सोडवीं । मेदिनी हे ॥
जगात तू आपली कीर्ति वाढव, स्वधर्माचा महिमा वाढव आणि दुर्योधनादी दुष्टांच्या भारापासून या पृथ्वीला सोडव.
आतां पार्था नि:शंकु होईं । या संग्रामा चित्त देईं । एथ हेंवांचूनि कांहीं । बोलों नये ॥
पार्था, आता तू निःशंक होऊन या युद्धाचे ठिकाणी लक्ष दे; याशिवाय दुसरे काही बोलू नको.
हें अनुपरोध मत माझें । जिहीं परमादरें स्वीकारिजे । श्रद्धापूर्वक अनुष्ठिजे । धनुर्धरा ॥
अर्जुना, या माझ्या अबाधित मतांचा जे मोठ्या आदराने स्वीकार करून त्यांचे श्रद्धापूर्वक आचरण करतील,
तेही सकळ कर्मीं वर्ततु । जाण पां कर्मरहितु । म्हणौनि हें निश्चितु । करणीय गा ॥
ते सकळ कर्माचे आचरण करून कर्मरहित आहेत, असे जाण. म्हणून, हे माझे मत निश्चयाने आचरण्यास योग्य आहे.
नातरी प्रकृतिमंतु होऊनी । इंद्रियां लळा देउनी । जे हें माझें मत अव्हेरुनी । ओसंडिती ॥
नाही तर देहाच्या पाशात गुंतून व इंद्रियांचे लाड पुरवून जे माझ्या मताचा तिरस्कार करून टाकून देतात,
जे सामान्यत्वें लेखिती । अवज्ञा करूनि देखती । कां हा अर्थवादु म्हणती । वाचाळपणें ॥
जे त्याला सामान्य समजतात, त्याची थट्टा करितात किंवा वाचाळपणे ती व्याजस्तुती आहे असे म्हणतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -