घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

परी तो संवचोराचा सांगातु । जैसा नावेक स्वस्थु । जंव नगराचा प्रांतु । सांडिजेना ||
परंतु ते समाधान म्हणजे संभावित चोराची गाठ पडल्यावर तो चोर जसा नगरसीमा ओलांडीपर्यत स्वस्थ असतो, आणि मग घोर वनात गेल्यावर जसा सर्वस्वी नाश करितो, तसे होय.
बापा विषाची मधुरता । झणें आवडी उपजे चित्ता । परी तो परिणामु विचारितां । प्राणु हरी ||
बाबारे, बचनाग (विषाची कांडी) प्रथम खाताना गोड लागतो खरा, परंतु त्याच्या परिणामाचा विचार केला असता तो प्राणघातक असतो, त्याप्रमाणे
देखैं इंद्रियीं कामु असे । तो लावी सुखदुराशे । जैसा गळीं मीनु आमिषें । भुलविजे गा ||
इंद्रियाचे ठिकाणी असणारा जो काम तो विषयसुखाच्या दुराशेला लावतो. ज्याप्रमाणे मासा गळाला लावलेल्या अमिषाला भुलतो,
परी तयामाजीं गळु आहे । जो प्राणातें घेऊनि जाये । तो जैसा ठाउवा नोहे । झांकलेपणें ||
परंतु अमिषाचे आत गळ झाकलेला आहे, तो आपला प्राण घेईल, हे त्याला कळत नाही;
तैसें अभिलाषें येणें कीजेल । विषयांची आशा धरिजेल । तरी वरपडा होईजेल । क्रोधानळा ||
त्याप्रमाणे विषवसुखाच्या अभिलाषाने जो विषयाची इच्छा करील, तो क्रोधाग्नीत सापडेल.
जैसा कवळोनियां पारधी । घातेचिये संधी । आणी मृगातें बुद्धी । साधावया ||
ज्याप्रमाणे पारधी मृगाला धरण्याकरिता चारी बाजूंनी मारण्याची संधि साधून वळवून आणतात,
एथ तैसीचि परी आहे । म्हणौनि संगु हा तुज नोहे । पार्था दोन्ही कामक्रोध हे । घातुक जाणें ||
त्याप्रमाणे ह्या विषयसुखाची तर्‍हा आहे; म्हणून, पार्था, कामक्रोध हे घातक समजून त्यांचा संग तू करू नको

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -