घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

जयांसि भुकेलियां आमिषा । हें विश्व न पुरेचि घांसा । कुळवाडियांचिया आशा । चाळीत असे ॥
काय चमत्कार सांगावा! यांच्या नुसत्या भुकेच्या इच्छेला हे विश्व एक घासालादेखील पुरत नाही आणि आशा ही यांच्या व्यापाराची वृद्धी करिते.
कौतुकें कवळितां मुठीं । जिये चवदा भुवनें थेंकुटी । तिये भ्रांतिही धाकुटी । वाल्हीदुल्ही ॥
जिने सहज आपल्या मुठी वळल्या असता त्यात मावण्याला चौदा भुवनेही कमीच; अशा तर्‍हेची जी भ्रांती ती आशेची धाकटी बहीण आहे.
जे लोकत्रयाचें भातुकें । खेळतांचि खाय कवतिकें । तिच्या दासीपणाचेनि बिकें । तृष्णा जिये ॥
जी ही भ्रांती केवळ भातुकली खेळता खेळता तिन्ही लोक सहज खाऊन टाकते आणि तृष्णा हिच्या दास्य बळावरच पुष्ट होते.
हें असो मोहें मानिजे । यांतें अहंकारें घेपे दीजे । जेणें जग आपुलेनि भोजें । नाचवीत असे ॥
हे असो; पण मोहाच्या घरी या कामक्रोधांना प्रतिष्ठा आहे; आणि ज्या अहंकाराने सर्व जगाला नाचवून सोडले आहे, त्या अहंकाराची यांशी देवघेव आहे.
जेणें सत्याचा भोकसा काढिला । मग अकृत्य तृणकुटा भरिला । तो दंभु रूढविला । जगीं इहीं ॥
ज्या दंभाने सत्याचा कोथळा फोडून त्यात दुष्ट कृत्यांचा पेढा भरला, त्या दंभाला यांनीच जगात प्रसिद्धीला आणले.
साध्वी शांति नागविली । मग माया मांगी शृंगारिली । तियेकरवीं विटाळविलीं । साधुवृंदें ॥
यांनी पतिव्रतारूप शांतीला लुबाडून घेऊन मायारूप मांगिणीला सजविले आणि तिच्याकडून साधूंचे समुदाय भ्रष्ट करविले!
इहीं विवेकाची त्राय फेडिली । वैराग्याची खाल काढिली । जितया मान मोडिली । उपशमाची ॥
यांनी विवेक नाहीसा केला; वैराग्याची खोड मोडली आणि जित्या उपशमाची मान तोडली!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -