घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

जैसी चंदनाची मुळी । गिंवसोनि घेपे व्याळीं । नातरी उल्बाची खोळी । गर्भस्थासी ॥
अर्जुना, फार काय सांगावे, जेथे ज्ञान आहे तेथे हे काम क्रोध आहेतच जसा साप चंदनाच्या मुळाला वेढून राहतो किंवा मोटेने गर्भ जसा आच्छादित असतो;
कां प्रभावीण भानु । धूमेवीण हुताशनु । जैसा दर्पण मळहीनु । कहींच नसे ॥
अथवा प्रभेशिवाय सूर्य, धुराशिवाय अग्नी किंवा पार्‍याशिवाय आरसाही ज्याप्रमाणे सापडावयाचे नाहीत,
तैसें इहींवीण एकलें । आम्हीं ज्ञान नाहीं देखिलें । जैसें कोंडेनि पां गुंतलें । बीज निपजे ॥
ज्याप्रमाणे बीज कोंड्याने आच्छादिलेलेच उत्पन्न होते, त्याप्रमाणे कामक्रोधाशिवाय शुद्धज्ञान आमच्या दृष्टीस कधी पडले नाही.
तैसें ज्ञान तरी शुद्ध । परी इहीं असे प्ररुद्ध । म्हणौनि तें अगाध । होऊनि ठेलें ॥
तसे ज्ञान हे स्वतः जरी शुद्ध असले, तरी कामक्रोधानी आच्छादित असते, म्हणूनच ते गहन होऊन बसले आहे.
आधीं यांतें जिणावें । मग तें ज्ञान पावावें । तंव पराभवो न संभवे । रागद्वेषां ॥
अगोदर कामक्रोधास जिंकावे, मग ज्ञान प्राप्त होते, पण त्या कामक्रोधास जिंकणे कठीण !
यांतें साधावयालागीं । जें बळ आणिजे आंगीं । तें इंधनें जैसीं आगी । सावावो होय ॥
कारण, यांना जिंकण्याकरिता जे जे अवसान आणावे ते ते उलट त्यांनाच साह्याकरी होते. जसे अग्नी विझविण्याकरिता लाकडे टाकिली असता ती त्यालाच साह्य करितात.
तैसे उपाय कीजती जे जे । ते यांसीचि होती विरजे । म्हणौनि हटियांतें जिणिजे । इहींचि जगीं ॥
त्याप्रमाणे, जे जे उपाय करावे ते ते यांनाच मदत करतात; म्हणून या जगामध्ये हटयोग्यांनादेखील हेच जिंकतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -