घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

हो कां जयाचिया प्रीती । अमूर्त हा आला व्यक्ती । मज एकवंकी याची स्थिती । आवडतु असे ॥
पहा की, ज्याच्या प्रीतीकरिता निराकार साकार झाला, यावरून मला तर असे वाटते की, या दोघांची स्थिती (देह) जरी भिन्न आहे, तरी दोघे एकरूपच आहेत.
एर्‍हवीं हा योगियां नाडळे । वेदार्थासी नाकळे । जेथ ध्यानाचेही डोळे । पावतीना ॥
एर्‍हवी हा भगवान योग्यांना आढळत नाही, वेदार्थालाही ज्याचे आकलन होत नाही व ज्याचे ठिकाणी ध्यानाची दृष्टी पोहोचत नाही.
तो हा निजस्वरूप । अनादि निष्कंप । परी कवणें मानें सकृप । जाहला आहे ॥
असा जो आत्मस्वरूप, अनादी, अविक्रिय भगवान तो अर्जुनावर किती कृपावंत झाला आहे!
हा त्रैलोक्यपटाची घडी । आकाराची पैलथडी । कैसा याचिये आवडी । आवरला असे ॥
हा त्रैलोक्यरूप वस्त्राच्या संकोचविस्ताराचे अधिष्ठान आहे. (त्रैलोक्य हे याचे रूप असून त्याची घडी करून हा अवतार घेऊन आला आहे.) आणि आकाराच्या पलीकडला म्हणजे निराकार असून हा अर्जुनाला इतक्या प्रेमाने कसा स्वाधीन झाला नकळे !
मग देव म्हणे अगा पंडुसुता । हाचि योगु आम्हीं विवस्वता । कथिला परी ते वार्ता । बहुतां दिवसांची ॥
मग श्रीकृष्ण अर्जुनास म्हणाले :- ज्याचा उपाय कर्मयोग आहे असा हा ज्ञानयोग आम्ही पूर्वी विवस्वानाला – सूर्याला सांगितला; परंतु त्या गोष्टीला खूप दिवस झाले.
मग तेणें विवस्वतें रवी । हे योगस्थिति आघवी । निरूपिली बरवी । मनूप्रती ॥
सूर्याने हा सर्व योग वैवस्वत मनूला सांगितला;
मनूनें आपण अनुष्ठिली । मग इक्ष्वाकुवा उपदेशिली । ऐसी परंपरा विस्तारिली । आद्य हे गा ॥
आणि मनूने त्याचे आचरण करून इक्ष्वाकु नामक आपल्या पुत्रास त्याचा उपदेश केला. अशी ही मुळापासून परंपरा चालत आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -