Saturday, June 3, 2023
27 C
Mumbai
घर संपादकीय वाणी संतांची वाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

तरी देवा हें ऐसें कैसें । जे ज्ञानियांचीही स्थिति भ्रंशे । मार्गु सांडुनि अनारिसे । चालत देखों ||
देवा, ज्ञान्यांचीसुद्धा स्थिती भ्रष्ट होऊन ते भलत्याच मार्गाने जातात, हे कसे?
सर्वज्ञुही जे होती । हे उपायही जाणती । तेही परधर्में व्यभिचरति । कवणें गुणें ? ||
ते सर्वज्ञही असतात व त्यांना त्याज्य काय व ग्राह्य काय याचे ज्ञान असते; तथापि ते परधर्माचे आचरण कोणत्या कारणाने करितात?
बीजा आणि भूसा । अंधु निवाडु नेणें जैसा । नावेक देखणाही तैसा । बरळे कां पां ||
जसे आंधळ्या मनुष्यास धान्य आणि कोंडा निराळे करता येत नाहीत, तसे डोळसासही का व्हावे?
जे असता संगु सांडिती । तेचि संसर्गु करितां न धाती । वनवासीही सेविती । जनपदातें ||
जे असलेला संग सोडतात, तेच पुनः संग करूनही तृप्त होत नाहीत व वनवासात असलेलेही व्यावहारिक लोकात येऊन राहतात.
आपण तरी लपती । सर्वस्वें पाप चुकविती । परी बळात्कारें सुइजती । तयाचि माजीं ||
वास्तविक ते पापापासून अलिप्त असावे व पाप आपल्या हातून होऊ नये, अशी इच्छा करितात; परंतु त्यांना बलात्काराने पापात कोणी तरी घातल्याची प्रतीति येते.
जयाची जीवें घेती विवसी । तेचि जडोनि ठाके जीवेंसीं । चुकवितां ते गिंवसी । तयातेंचि ||
ज्या विषयांचा ते मनापासून तिटकारा करतात, तेच विषय त्यांच्या जीवाशी जडून राहतात. ते चुकवायाचा प्रयत्न केला तरी ते पुनःत्यातच गुंततात.
ऐसा बलात्कारु एकु दिसे । तो कवणाचा एथ आग्रहो असे । हें बोलावें हृषीकेशें । पार्थु म्हणे ||
अशा रीतीने ज्ञानवानांच्या विषयसेवनांत बलात्कार दिसतो. तो बलात्कार करण्याचा आग्रह कोणाचा आहे, हे आपण कृपा करून सांगावे, असे अर्जुन म्हणाला.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -