Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर संपादकीय वाणी संतांची वाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

इहीं संतोषवन खांडिलें । धैर्यदुर्ग पाडिले । आनंदरोप सांडिले । उपडूनियां ॥
यांनी संतोषरूपी वन तोडून टाकिले, धैर्यरूपी किल्ला जमीनदोस्त केला आणि आनंदरूपी रोपटे उपटून टाकिले.
इहीं बोधाचीं रोपें लुंचिलीं । सुखाची लिपी पुसिली । जिव्हारीं आगी सूदली । तापत्रयाची ॥
यांनी ज्ञानाची रोपे उपटून टाकिली, सुखाचे नावसुद्धा पुसून टाकले आणि प्राणिमात्रांच्या हृदयात त्रिविध तापाची आग उत्पन्न केली.
हे आंगा तंव घडले । जीवींचि आथी जडले । परी नातुडती गिंवसिले । ब्रह्मादिकां ॥
हे शरीराबरोबर उत्पन्न झालेले असून जीवातच जडून राहिले आहेत; परंतु शोध करायाला गेले असता ब्रह्मादिकांसही सापडत नाहीत.
हे चैतन्याचे शेजारीं । वसती ज्ञानाच्या एका हारीं । म्हणौनि प्रवर्तले महामारी । सांवरती ना ॥
हे ब्रह्मस्वरूपाच्या शेजारी आणि ज्ञानाच्या पंक्तीला बसतात; म्हणून जगताचा महाप्रलय करण्यास प्रवृत्त होऊन कोणाला आवरत नाहीत.
हे जळेंवीण बुडविती । आगीवीण जाळिती । न बोलतां कवळिती । प्राणियांतें ॥
हे कामक्रोध पाण्याशिवाय बुडवितात, अग्नीशिवाय जाळतात आणि प्राण्याला न कळता गिळतात,
हे शस्त्रेंवीण साधिती । दोरेंवीण बांधिती । ज्ञानियासी तरी वधिती । पैज घेउनी ॥
हे शस्त्राशिवाय मारतात, दोराशिवाय बांधून ठेवितात आणि तत्त्ववेत्यांना पैजेने आपल्या अधीन करून घेतात.
हे चिखलेंवीण रोंविती । पाशिकेंवीण गोंविती । हे कवणाजोगें न होती । आंतौटेपणें ॥
हे चिखलाशिवाय रोवतात, पाशाशिवाय लोकांना बांधून ठेवितात आणि शरीराच्या इतक्या अंतर्यामी पोहोचल्यामुळे याच्या बरोबरीचे दुसरे कोणी नाहीत.
जैसी चंदनाची मुळी । गिंवसोनि घेपे व्याळीं । नातरी उल्बाची खोळी । गर्भस्थासी ॥
अर्जुना, फार काय सांगावे, जेथे ज्ञान आहे तेथे हे काम क्रोध आहेतच जसा साप चंदनाच्या मुळाला वेढून राहतो किंवा मोटेने गर्भ जसा आच्छादित असतो.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -