घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

आतां महदादि हे माझी माया । उतरोनियां धनंजया । मी होइजे हें आया । कैसेनि ये? ॥
तेव्हा आता धनंजया, ही महत्तत्वादी माझी माया तरून मद्रूप व्हावे, या गोष्टीचा अनुभव कसा यावा!
जिये ब्रह्माचळाचा आधाडा । पहिलिया संकल्पजळाचा उभडा । सवेंचि महाभूतांचा बुडबुडा । साना आला ॥
(कारण) जी मायानदी निर्मळ ब्रह्मरूपी पर्वताच्या त्या तुटलेल्या कड्यात असतानाच प्रथम तिच्या ठायी संकल्परूप जलाचा उगम होऊन पंचमहाभूतांचा लहानसा बुडबुडा आला;
जे सृष्टिविस्ताराचेनि वोघें । चढत काळकळनेचेनि वेगें । प्रवृत्तिनिवृत्तीचीं तुंगें । तटें सांडी ॥
जी सृष्टीच्या विस्ताररूपी ओघाने व कालगतीच्या वेगाने कर्ममार्ग मोक्षमार्ग यांचे उंच काठ (तीर) ओलांडून चालली आहे;
जे गुणघनाचेनि वृष्टिभरें । भरली मोहाचेनि महापूरें । घेऊनि जात नगरें । यमनियमांचीं ॥
जी सत्वादि गुणरूपी ढगांच्या वृद्धीने भरून भ्रमरूप महापुराने यमनियमरूपी शहरे वाहून नेत आहे;
जें द्वेषाच्या आवर्तीं दाटत । मत्सराचे वळसे पडत । माजीं प्रमादादि तळपत । महामीन ॥
जिच्यात द्वेषरूपी भोवरे असून जी मत्सररूप वळणाने वाहत आहे; जिच्यात उन्मत्तपणा इत्यादी मोठाले मासे तळपत आहेत;
जेथ प्रपंचाचीं वळणें । कर्माकर्मांचीं वोभाणें । वरी तर्ताती वोसाणें । सुख-दुःखांचीं ॥
जिच्यात प्रपंचरूपी बेटांची वळणे असून कर्माकर्म सुखदुःखरूपी केरकचरा तरंगत येऊन कडेला लागत आहे.
रतीचिया बेटा । आदळती कामाचिया लाटा । जेथ जीवफेन संघटा । सैंघ दिसे ॥
जी मधील विषयसुखरूपी बेटावर कामरूपी लाटा आढळून त्या ठिकाणी जीवसमुदायरूपी फेस एकत्र झालेला दिसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -