घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

तरी आपुलिया सवेशा । कां न मागावासि परेशा । देवा सुकाळु हा मानसा । पाहला असे ॥
तर मग परमेश्वरा, आपल्याच इच्छेने तुमच्या पाशी आम्ही वाटेल ते का मागू नये? देवा, आज मनातील हेतू पूर्ण होण्याचा दिवस उगवला आहे!
देखैं सकळार्तींचें जियालें । आजि पुण्य यशासि आलें । हे मनोरथ जहाले । विजयी माझे ॥
हे पहा आज माझ्या सर्व इच्छा परिपूर्ण होऊन व माझे पूर्वपुण्य फळास येऊन सर्व मनोरथ सिद्धीस गेले;
जी जी परममंगळधामा । सकळ देवदेवोत्तमा । तूं स्वाधीनु आजि आम्हां । म्हणौऊनियां ॥
कारण, कल्याणाचे आदिपीठ व सर्व देवाचे देव, जे तुम्ही ते आज आमच्या आधीन झाला आहात.
जैसें मातेच्या ठायीं । अपत्या अनवसरू नाहीं । स्तन्यालागूनि पाहीं । जियापरी ॥
आईचे स्तनपान करण्यास मुलाला जशी वेळ अवेळ यांची अडचण नसते.
तैसें देवा तूतें । पुसिजतसे आवडे तें । आपुलेनि आर्तें । कृपानिधी ॥
त्याप्रमाणे देवा, कृपानिधे, मी तुम्हाला माझे इच्छेनुरूप वाटेल ते विचारीत आहे.
तरी पारत्रिकीं हित । आणि आचरितां तरी उचित । तें सांगैं एक निश्चित । पार्थु म्हणे ॥
अर्जुन म्हणतो,‘म्हणून देवा, इहलोकी आचरण्यास योग्य व परलोकी हितकारक अशी एक निश्चित गोष्ट सांगा.’
या बोला श्रीअच्युतु । म्हणतसे विस्मितु । अर्जुना हा ध्वनितु । अभिप्रावो ॥
हे बोलणे ऐकून श्रीकृष्ण आश्चर्याने म्हणतात :- ‘अर्जुना, तुला जो अभिप्राय सांगितला तो गर्भितार्थ आहे.
जे बुद्धियोग सांगतां । सांख्यमतसंस्था । प्रकटिली स्वभावता । प्रसंगें आम्हीं ॥
ईश्वरार्पण कर्ममार्ग सांगताना प्रसंगानुसार जो ज्ञानमार्गाचा महिना आम्ही सांगून गेलो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -