Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर संपादकीय वाणी संतांची वाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

जे तत्त्वज्ञानियांच्या ठायीं । तो प्रकृतिभावो नाहीं । जेथ कर्मजात पाहीं । निपजत असे ॥
ज्यामुळे सर्व कर्म उत्पन्न होते, तो देहाभिमान तत्त्वज्ञान्यांच्या ठिकाणी मुळीच नसतो.
ते देहाभिमानु सांडुनी । गुर्णकर्में वोलांडुनी । साक्षिभूत होऊनी । वर्तती देहीं ॥
ते ज्ञानी देहाचा अभिमान सोडून व गुणकर्मातील होऊन देहात फक्त साक्षित्वाने वागतात.
म्हणौनि शरीरी जरी होती । तरी कर्मबंधा नातळती । जैसा कां भूतचेष्टा गभस्ती । घेपवेना ॥
म्हणून सूर्य ज्याप्रमाणे जगतावर प्रकाश पाडतो, पण जगाच्या कर्मांनी लिप्त होत नाही, त्याप्रमाणे ते जरी देह धारण करितात, तरी देहकर्मांनी बद्ध होत नाहीत.
एथ कर्मीं तोचि लिंपे । जो गुणसंभ्रमें घेपे । प्रकृतीचेनि आटोपें । वर्ततु असे ॥
प्रकृतीच्या अधीन होऊन जो वागतो व गुणांच्या सपाट्यात सापडतो, तोच कर्माने लिप्त होतो.
इंद्रियें गुणाधारें । राहाटती निजव्यापारें । तें परकर्म बलात्कारें । आपादी जो ॥
इंद्रिये गुणांच्या अधीन होऊन आपापल्या व्यापारात वर्तत असता, ते दुसर्‍याचे कर्म ‘मीच करितो’ असे तो मुद्दाम अंगावर घेतो.
तरी उचितें कर्में आघवीं । तुवां आचरोनि मज अर्पावीं । परी चित्तवृत्ति न्यासावी । आत्मरूपीं ॥
म्हणून, सर्व विहित कर्मांचें आचरण करून तू ती मला अर्पण करावी; पण चित्तवृत्ती मात्र सदैव आत्मस्वरूपी ठेवावी.
आणि हें कर्म मी कर्ता । कां आचरैन या अर्था । ऐसा अभिमानु झणें चित्ता । रिगों देसीं ॥
या कर्माचा मी कर्ता आहे आणि अमुक फळासाठी हे मी करीत आहे, असा अभिमान तू आपल्या चित्तात उत्पन्न होऊ देशील हो.

 

- Advertisement -

 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -