घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

जे जाणणेयां आघवेयांच्या गांवीं । गुरुत्वाची आचार्य पदवी । जें सकळ गुह्यांचा गोसावी । पवित्रां रावो ॥
ज्याला सर्व ज्ञानाच्या ठिकाणी मुख्य असे आचार्याचे स्थान मिळते, जे सर्व पूर्व गुह्याचा स्वामी, पवित्र वस्तूंचा राजा,
आणि धर्माचें निजधाम । तेवींची उत्तमाचें उत्तम । पैं जया येतां नाहीं काम । जन्मांतराचें ॥
आणि धर्माचे अधिष्ठान; तसेच उत्तमात उत्तम व ज्या ज्ञानाची प्राप्ती झाली असता दुसरा पुनः जन्म घेण्याचे कारण राहात नाही.
मोटकें गुरुमुखें उदैजत दिसे । आणि हृदयीं स्वयंभचि असे । प्रत्यक्ष फावों लागे तैसें । आपैसयाचि ॥
जे ब्रह्मज्ञान गुरूच्या मुखाने वाक्यद्वारा उत्पन्न होते न होते तोच शिष्याच्या हृदयात स्वयमेव असलेले (ब्रह्म) त्यास सहजच प्रत्यक्ष होते.
तेवींचि गा सुखाच्या पाउटीं । चढतां येइजे जयाच्या भेटी । मग भेटल्या कीर मिठी । भोगणेयांही पडे ॥
त्याचप्रमाणे, सुखाच्या पायरीने चढत गेले असता ज्याची भेट होते आणि मग भेट झाल्यावर, भेटीपासून होणार्‍या सुखाचा ज्याच्या ठिकाणी लय होतो.
परि भोगाचिये ऐलीकडिलिये मेरे । चित्त उभें ठेलें सुखा भरे । ऐसें सुलभ आणि सोपारें । वरि परब्रह्म ॥
परंतु, ज्याच्या प्राप्तीच्या सुखाच्या अलीकडील काठावर उभे असताही चित्त आनंदयुक्त होते, असे सुलभ आणि सोपे असून जे परब्रह्म होय.
पैं गा आणिकही एक याचें । जें हातां आलिया तरी न वचे । आणि अनुभवितां कांहीं न वेचे । वरि विटेहि ना ॥
खरोखर या ज्ञानात आणखीही गुण आहेत; ते हे की, हे प्राप्त झाले असता नाहीसे होत नाही; हे अनुभव घेतल्याने कमी होत नाही आणि विटतही नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -