घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

येथ जरी तूं तार्किका । ऐसी हन घेसी शंका । ना येवढी वस्तू हे लोकां । उरली केविं पा? ॥
हे चतुर अर्जुना, आता तू जर अशी शंका घेशील की, एवढी अप्रतिम वस्तू असताना लोकांच्या हातून कशी राहिली? म्हणजे इतक्या उत्तम वस्तूकडे लोक का बघत नाहीत?
जे एकोत्तरेयाचिया वाढी । जळतिये आगीं घालिती उडी । ते अनायासें स्वगोडी । सांडिती केवीं? ॥
कारण, जे लोक एकोत्रा व्याजाकरिता चोरास पैसे देण्याच्या आगीताही उडी घालण्यास मागेपुढे पाहत नाहीत, ते सहज आपल्या ठिकाणीच असलेली गोडी कशी टाकून देतील?
तरी पवित्र आणि रम्य । तेवींचि सुखोपाय गम्य । आणि स्वसुख परम धर्म्य । वरि आपणपां जोडे ॥
तरी पवित्र आणि रमणीय, तसेच सुख देणारे, जाणण्यास सुलभ, अति सुखकारक, धर्माला पूर्ण अनुकूल व आपले ठिकाणीच प्राप्त होणारे.
ऐसा अवघाचि हा सुरवाडु आहे । तरी जना हातीं केविं उरों लाहे । हा शंकेचा ठावो कीर होये । परि न धरावी तुवां ॥
अर्जुना, याप्रमाणे सर्व गोष्टी अनुकूल असताही, लोकांच्या हाती लागल्याशिवाय हे कसे राहिले? ही शंका घेण्यास जागा आहे खरी; परंतु तू अशी शंका घेऊ नको.
पाहें पां दूध पवित्र आणि गोड । पासीं त्वचेचिया पदराआड । परि तें अव्हेरूनि गोचिड । अशुद्ध काय न सेविती? ॥
हे पहा, गाईचे दूध हे पवित्र असून गोड आहे; तसेच अगदी जवळ त्वचेच्या पडद्याच्या आतच आहे; परंतु ते सोडून गोचीड रक्तच सेवन करीत नाही का?
कां कमलकंदा आणि दर्दुरीं । नांदणूक एकेचि घरीं । परि परागु सेविजे भ्रमरीं । येरां चिखलुचि उरे ॥
किंवा कमळाचा कांदा व बेडूक हे एकेच ठिकाणी वास्तव्य करितात, परंतु कमळातील मकरंदाचे सेवन भ्रमर करितात व बेडकांच्या वाट्याला चिखलच राहतो!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -