घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

नातरी निदैवाच्या परिवरीं । लोह्या रुतलिया आहाति सहस्रवरी । परि तेथ बैसोनि उपवासु करी । कां दरिद्रें जिये ॥
अथवा दुर्दैव्याच्या घरी मोहरा वगैरे द्रव्यांनी भरलेल्या हजारो कढया पुरलेल्या असूनही तो तेथे बसून उपास काढून दारिद्रावस्था भोगतो.
तैसा हृदयामध्यें मी रामु । असतां सर्वसुखाचा आरामु । कीं भ्रांतासी कामु । विषयावरी ॥
त्याचप्रमाणे, प्राणिमात्राच्या सर्व सुखांचे विश्रांतीस्थान असा मी ‘राम’ प्राण्यांच्या हृदयातच असता त्या अज्ञानी जीवाची विषयावर वासना असते.
बहु मृगजळ देखोनी डोळां । थुंकिजे अमृताचा गिळितां गळाळा । तोडिला परिसु बांधिला गळां । शुक्तिकालाभें ॥
बरेच जण मृगजळ डोळ्यांनी पाहून तोंडात असलेला अमृताचा घोट थुंकून टाकावा किंवा शिंप मिळाली असता गळ्यात बांधलेला परीस तोडून टाकावा.
तैसीं अहंममतेचिये लवडसवडी । मातें न पवतीचि बापुडीं । म्हणौनि जन्ममरणाची दुथडीं । डहुळितें ठेलीं ॥
त्याप्रमाणे ज्यांच्या मनावर अहंममतेचा पगडा बसलेला आहे. ते बिचारे मला प्राप्त होत नाहीत, म्हणून जन्ममरणाच्या दोन्ही तीराच्या मध्येच बुचकळ्या खात बसतात!
एर्‍हवीं मी तरी कैसा । मुखाप्रति भानु कां जैसा । कहीं दिसे न दिसे ऐसा । वाणीचा नोहे ॥
एर्‍हवी मी कसा आहे म्हणशील, तर सूर्य ज्याप्रमाणे वाटेल तिकडून पाहणार्‍याला आपल्या तोंडासमोर दिसतो, तथापि त्याच्यामध्ये केव्हा दिसणे व केव्हा न दिसणे ही जी उणीव आहे, ती माझ्या ठिकाणी नाही.
माझेया विस्तारलेपणा नांवें । हें जगचि नोहे आघवें?। जैसें दूध मुरालें स्वभावें । तरि तेंचि दहीं ॥
माझा विस्तार म्हणजेच जग नाही का? (तर होय, माझाच विस्तार आहे). ते कसे? तर जसे दूध विरजले असता तेच स्वभावत:च दही होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -