घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

सांगें पडिसादाचीं प्रत्युत्तरें । कां आरिसां जें आविष्करें । तें आपलें कीं साचोकारें । तेथेंचि होतें? ॥
आपल्या शब्दाचा जो प्रतिध्वनी ऐकू येतो किंवा आरशात जे आपले स्वरूप आपण पाहतो, तो खरोखर आपल्या बोलण्याचा किंवा पाहण्याचा परिणाम आहे किंवा आपल्या पूर्वीच ते तेथे खरेपणाने होते का सांग बरे!
तैसी इये निर्मळे माझ्या स्वरूपीं । जो भूतभावना आरोपी । तयासी तयाच्या संकल्पीं । भूताभासु असे ॥
त्याप्रमाणे या माझ्या निरुपाधिक स्वरुपावर जो भूतांच्या कल्पनेचा आरोप करितो, त्याला त्याच्या कल्पनेमुळे माझ्या ठिकाणी भूतांचा भास होतो.
तेचि कल्पिती प्रकृती पुरे । तरि भूताभासु आधींचि सरे । मग स्वरूप उरे एकसरें । निखळ माझें ॥
तीच कल्पना करणारी माया संपली म्हणजे माझ्या ठिकाणचा भूतांचा भास अगोदरच नसतो; मग माझे निरुपाधिक असे जे शुद्ध स्वरूप, तेच निखालस उरते.
हें असो आंगीं भरलिया भवंडीं । जैशा भोंवत दिसती अरडीदरडी। तैशी आपुलिया कल्पना अखंडीं । गमती भूतें ॥
हे असो; आपल्या भोवती गरगर फिरताना भोवड आल्यावर ज्याप्रमाणे डोंगर वगैरे फिरतातसे दिसतात, त्याप्रमाणे आपल्या मनात कल्पना उत्पन्न झाल्यावर अखंड ब्रह्मत्वरूपात भूतांचा भास होतो.
तेचि कल्पना सांडूनि पाहीं । तरि मी भूतीं भूतें माझिया ठायीं । हें स्वप्नींही परि नाहीं । कल्पावयाजोगें ॥
तीच कल्पना सोडून जर पाहिले, तर मी भूतांच्या ठिकाणी भूते माझ्या ठिकाणी आहेत, अशी स्वप्नांतदेखील कल्पना करण्यासारखी गोष्ट नाही.
आतां मीच एक भूतांतें धर्ता । अथवा भूतांमाजीं मी असता । या संकल्पसन्निपाता । आंतुलिया बोलिया ॥
आता, ‘मीच एक भूतांचा धारण करणारा अथवा भूतांत असणारा’ या सर्व गोष्टी संकल्परूप सन्निपात वायूच्या लहरींतील बडबडी आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -