घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

तंव हृदयकमळआरामु । जो योगियांचा निष्कामकामु । तो म्हणतसे पुरुषोत्तमु । सांगेन आइक ||
तेव्हा हृदयास रमविणारा आणि योगिजन ज्याची निष्कामबुद्धीने इच्छा करतात, असा जो पुरुषोत्तम तो म्हणाला: सांगतो ऐक.
तरी हे काम क्रोधु पाहीं । जयांतें कृपेची सांठवण नाहीं । हें कृतांताच्या ठायीं । मानिजती ||
हृदयामध्ये वास करणारे हे काम आणि क्रोध हेच पुरुषास पापामध्ये प्रवृत्त करणारे आहेत; कारण या कामक्रोधाच्या ठिकाणी दया अजिबात नाही, फार काय सांगावे, दुसर्‍याचा नाश करण्यात ते यमाप्रमाणे समर्थ आहेत.
हे ज्ञाननिधीचे भुजंग । विषयदरीचे वाघ । भजनमार्गींचे मांग । मारक जे ||
काय सांगू, हे कामक्रोध ज्ञानरूप धनाच्या ठेवीवरचे नाग व विषयखोर्‍यातील वाघ आणि भजनमार्गाचे मारेकरी मांग आहेत
हे देहदुर्गींचे धोंड । इंद्रियग्रामींचे कोंड । यांचें व्यामोहादिक दबड । जगावरी ||
देहरूप किल्ल्यावरील मोठे दगड व इंद्रियरूप गावातील कोंडवाडे आहेत आणि भ्रांती वगैरे उत्पन्न करण्याचा यांचा जगावर दपटशा आहे.
हे रजोगुण मानसाचे । समूळ आसुरियेचे । धालेपण ययांचें । अविद्या केलें ||
हे मनाच्या ठिकाणी भासणारे मुळापासून असुरी संपत्तीतील असून रजोगुणाचे कार्य आहेत. यांची तृप्ती अविवेकाकडून होते.
हे रजाचे कीर जाहले । परी तमासी पढियंते भले । तेणें निजपद यां दिधलें । प्रमादमोहो ||
हे रजोगुणापासून झालेले आहेत खरे, परंतु तमोगुणाचे फार आवडते आहेत, म्हणून तमोगुणाने आपले सर्वस्व – माजूरपणा व अज्ञान यास दिले आहे.
हे मृत्यूच्या नगरीं । मानिजती निकियापरी । जे जीविताचे वैरी । म्हणौनियां ||
हे जीविताचे शत्रू आहेत म्हणून मृत्यूचे नगरांत यांना चांगल्या प्रकारचा मान मिळतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -