घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

तैसें आदीचि जें नाहीं । तयालागीं तूं रुदसी कायी । तूं अवीट तें पाहीं । चैतन्य एक ॥
जे मुळातच नाही त्याबद्दल तू का रडतोस? अक्षय्य असे जे एक ब्रह्म आहे त्याकडे तू लक्ष दे.
जयाचि आतींचि भोगित । विषयीं त्यजिले संत । जयालागीं विरक्त । वनवासिये ॥
ज्या ब्रह्माची आवड उत्पन्न होताच संतांना विषय सोडतात, ज्या ब्रह्मासाठी वैराग्यसंपन्न वनवासी होतात,
दिठी सूनि जयातें । ब्रह्मचर्यादि व्रतें । मुनीश्वर तपातें । आचरताती ॥
आणि ज्या ब्रह्माकडे दृष्टी ठेवून श्रेष्ठ मुनी ब्रह्मचर्यादी व्रते व तप आचरतात.
एक अंतरीं निश्चळ । जें निहाळितां केवळ । विसरले सकळ । संसारजात ॥
(त्या ब्रह्माकडे तू लक्ष दे.) अंत:करणामध्ये स्थिर झालेले साधन ब्रह्माला पाहताना सर्व प्रकारचा संसार विसरतात,
एकां गुणानुवादु करितां । उपरति होऊनि चित्ता । निरवधि तल्लीनता । निरंतर ॥
त्याचे गुणानुवाद गाताना कित्येकांच्या मनात उपरती उत्पन्न होऊन शेवटी त्याच्या ठिकाणी अखंडित नित्य निमग्न होतात.
एक ऐकतांचि निवाले । ते देहभावीं सांडिले । एक अनुभवें पातले । तद्रूपता ॥
कोणी त्याचे स्वरूप ऐकून शांत होतात व देहाभिमानापासून निवृत्त होतात आणि कोणी अनुभवाने तद्रूप होतात.
जैसे सरिताओघ समस्त । समुद्रामाजीं मिळत । परी माघौते नसमात । परतले नाहीं ॥
ज्याप्रमाणे नद्यांचे सर्व ओघ समुद्रास मिळतात, परंतु समुद्रात जागा नाही म्हणून मागे परतत नाहीत,
तैसिया योगीश्वरांचिया मती । मिळणीसवें एकवटती । परी जे विचारूनि पुनरावृत्ति । भजतीचिना ॥
त्याप्रमाणे या थोर योग्यांच्या बुद्धी ब्रह्मसाक्षात्काराबरोबर तद्रूप होऊन जातात; अशा रीतीने विचार करून तद्रूप झालेले पुरुष पुन्हा संसारात येत नाहीत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -