घर संपादकीय वाणी संतांची वाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

आतां योगाचळाचा निमथा । जरी ठाकावा आथि पार्था । तरी सोपाना या कर्मपथा । चुका झणीं ॥
पार्था, अशाप्रकारे योगरूप पर्वताच्या माथ्यावर ज्याला जाण्याची इच्छा असेल त्याने कर्ममार्गरूपी जिना चढण्यास चुकू नये!
येणें यमनियमांचेनि तळवटें । रिगे आसनाचिये पाउलवाटें । येई प्राणायामाचेनि आडकंठें । वरौता गा ॥
या कर्ममार्गाने जावयास लागले म्हणजे प्रथम या पर्वताचा यमनियमरूपी तळ लागतो; नंतर आसनाच्या पाऊलवाटेने प्राणायामरूप कड्याने वर जावे लागते.
मग प्रत्याहाराचा अधाडा । जो बुद्धिचियाही पायां निसरडा । जेथ हटिये सांडिती होडा । कडेलग ॥
नंतर प्रत्याहार हाच कोणी अर्धा तुटलेला कडा लागतो. त्याच्यावरून बुद्धिचेही पाय निसटतात आणि तो तुटलेला कड्याचा मार्ग ओलांडताना कडेलोट होईल म्हणून हठयोग्यांच्यासुद्धा प्रतिज्ञा शेवटास जात नाहीत.
तरी अभ्यासाचेनि बळें । प्रत्याहारीं निराळें । नखीं लागेल ढाळेंढाळें । वैराग्याची ॥
परंतु अभ्यासाच्या बळाने प्रत्याहाररूप शून्यासारख्या कठीण मार्गात फक्त वैराग्यच हळूहळू चढू शकते.
ऐसा पवनाचेनि पाठारें । येतां धारणेचेनि पैसारें । क्रमी ध्यानाचें चवरें । सांपडे तंव ॥
अशारीतीने वायुरूप घोड्याच्या पाठीवर बसून मार्ग क्रमीत असता चित्त स्थिर करण्याच्या विस्तृत जाग्यावर आल्यानंतर ध्यानाचा शेवट स्वाधीन होईपर्यंत मार्ग क्रमण करितो.
मग तया मार्गाची धांव । पुरेल प्रवृत्तीची हांव । जेथ साध्यसाधना खेंव । समरसें होय ॥
मग ज्या ठिकाणी साध्य व साधन एक होतात, त्या ठिकाणी मार्गाची धाव व प्रकृतीची हाव संपते.
जेथ पुढील पैसु पारुखे । मागील स्मरावें तें ठाके । ऐसिये सरिसीये भूमिके । समाधि राहे ॥
आणि ज्या ठिकाणी पुढील पाऊल टाकणे बंद होऊन मागीलही आठवण राहत नाही, अशा समान भूमिकारूप समाधीवर तो पुरुष राहतो.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -