घर संपादकीय वाणी संतांची वाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

येणें उपायें योगारुढु । जो निरवधि जाहला प्रौढु । तयाचिया चिन्हांचा निवाडु । सांगैन आइकें ॥
या उपायाने जो योगारूढ होतो, तो निःसंशय परिपूर्ण झाला. आता त्याच्या लक्षणांचा निर्णय तुला सांगतो, तो ऐक.
तरी जयाचिया इंद्रियांचिया घरा । नाहीं विषयांचिया येरझारा । जो आत्मबोधाचिया वोवरां । पहुडला असे ॥
हे पहा जो आत्मबोधाच्या तळघरात निजलेला असतो, म्हणजे ज्याला आत्मज्ञान झालेले असते, त्याच्या इंद्रियाच्या घरी विषयाचे येणेजाणे बंद होते.
जयाचें सुख-दु:खाचेनि आंगे । झगटलें मानस चेवो नेघे । विषय पासींही आलिया से न रिगे । हें काय म्हणौनि ॥
सुख-दुःखाशी झगडताना त्याचे मन जागे होत नाही. तसेच त्याच्याजवळ जरी विषय मूर्तिमंत येऊन उभे राहिले, तरी ते कोण आहेत त्याबद्दल याला भानही नसते.
इंद्रियें कर्माच्या ठायीं । वाढीनलीं परि कहीं । फळहेतूची चाड नाहीं । अंत:करणीं ॥
कदाचित इंद्रिये कर्म करण्याला प्रवृत्त झाली, तरी त्याला अंतःकरणात फलाच्या उद्देशाची केव्हाही इच्छा नसते.
असतेनि देहें एतुला । जो चेतुचि दिसे निदेला । तोचि योगारूढु भला । वोळखें तूं ॥
एवढे देहाचे व्यवहार चालले असताना जो झोपेतल्या स्थितीप्रमाणे उदासीन दिसतो, त्यालाच खरा योग साध्य झाला, असे तू समज.
तेथ अर्जुन म्हणे अनंता । हें मज विस्मो बहु अइकतां । सांगे तया ऐसी योग्यता । कवणे दीजे ॥
अशी योग्याची स्थिती ऐकून अर्जुन देवास म्हणतो :- हे अनंता, तुम्ही जे सांगता, ते ऐकून मला नवल वाटते; तर त्या योग्याला अशी योग्यता कोण देतो, हे मला सांगा.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -