Eco friendly bappa Competition
घर संपादकीय वाणी संतांची वाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

तंव हांसोनि श्रीकृष्ण म्हणे । तुझें नवल ना हें बोलणें । कवणासि काय दिजेल कवणें । अद्वैतीं इये ॥
त्या वेळेस श्रीकृष्ण हसून म्हणतात, तुझ्या बोलण्याचे मला नवल वाटते. कारण अशा अद्वैत स्थितीत कोणाला कोण देणार?
पैं व्यामोहाचिये शेजे । बळिया अविद्या निद्रितु होईजे । ते वेळीं दु:स्वप्न हा भोगिजे । जन्ममृत्यूंचा ॥
मनुष्य भ्रमरूप शय्येवर गाढ अज्ञानाने जेव्हा निजलेला असतो, त्या वेळेस जन्ममृत्यूची दुष्ट स्वप्ने भोगतो.
पाठीं अवसांत ये चेवो । तैं तें अवघेंचि होय वावो । ऐसा उपजे नित्य सद्भावो । तो ही आपणपांचि ॥
नंतर अकस्मात जागा झाल्यावर ती जन्ममरणरूप सर्व स्वप्ने व्यर्थ होतात; अमर आहोत असा त्याचा आपल्या ठिकाणीच निश्चय होतो.
म्हणौनि आपणचि आपणया । घातु कीजतु असे धनंजया । चित्त देऊनि नाथिलिया । देहाभिमाना ॥
म्हणून हे धनंजया, खोट्या देहाचा अभिमान धरून मनुष्य आपणच आपल्या घातास प्रवृत्त होतो.
हा विचारूनि अहंकारु सांडिजे । मग असतीचि वस्तु होईजे । तरी आपली स्वस्ति सहजें । आपण केली ॥
विचार करून हा अहंकार सोडला म्हणजे नित्यसिद्ध ब्रह्मवस्तूच हा होतो. असे झाले म्हणजे आपण आपले कल्याण केले असे सहज होते.
एर्‍हवीं कोशकीटकाचिया परी । तो आपणया आपण वैरी । जो आत्मबुद्धि शरीरीं । चारुस्थळीं ॥
नाहीतर जो सुशोभित अशा शरीराचे ठिकाणी लुब्ध होऊन आत्मस्वरूप विसरतो व आपलेपणा मानितो, तो कोशकिड्याप्रमाणे आपला आपण शत्रू होतो.
कैसे प्राप्तीचिये वेळे । निदैवा अंधळेपणाचे डोहळे । कीं असते आपुले डोळे । आपण झांकी ॥
काय सांगावे, लाभाची वेळ आली असता हतभागी मनुष्याला अंधळेपणाचे डोहाळे आठवून तो जसे आपले डोळे झाकून वस्तुलाभाला मुकतो.

 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -