Eco friendly bappa Competition
घर संपादकीय वाणी संतांची वाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

हें परिसतां जरी कानडें । तरी जाण पां पार्थ उघडें । कृष्णसुखाचेंचि रूपडें । वोतलें गा ॥
हे ऐकणाराला जरी अशक्य वाटेल, तरी पार्थ हा खरोखर श्रीकृष्णाच्या सुखाचीच ओतीव मूर्ती आहे, असे पक्के समजा.
हें असो वयसेचिये शेवटीं । जैसें एकचि विये वांझोटी । मग ते मोहाची त्रिपुटी । नाचों लागे ॥
हे असो; एखाद्या वांझ स्त्रीला, तिचे वय होऊन गेल्यानंतर, एकच मूल झाले म्हणजे ती जशी त्याच्यावरील प्रेमाची प्रत्यक्ष मूर्ती होऊन नाचू लागते,
तैसें जाहलें श्रीअनंता । ऐसें तरी मी न म्हणतां । जरी तयाचा न देखतां । अतिशयो एथ ॥
तशी श्रीकृष्णाची गोष्ट झाली आहे! त्याचे अर्जुनावरील अतिशय प्रेम जर दृष्टोत्पत्तीस न येते, तर मी असे बोललो नसतो.
पाहा पां नवल कैसें चोज । कें उपदेशु केउतें झुंज । परी पुढें वालभाचें भोज । नाचत असे ॥
पहा पहा, हे काय नवल व कोण आवड! की कसला युद्धप्रसंग आणि यात तर काय ब्रह्मज्ञानाचा उपदेश! परंतु अशा ठिकाणी भगवंताच्या प्रीतीचे चित्र जो अर्जुन, त्याच्या पुढे प्रेमाचे कौतुक नाचत आहे!
आवडी आणि लाजवी । व्यसन आणि शिणवी । पिसें आणि न भुलवी । तरी तेंचि काई? ॥
आवड असून लाज वाटत असेल, व्यसन असून शीण वाटत असेल, वेड लागून जर बुद्धि भ्रष्ट होत नसेल, तर ती आहेत असे म्हणण्यात अर्थ काय!
म्हणौनि भावार्थु तो ऐसा । अर्जुन मैत्रियेचा कुवासा । कीं सुखें शृंगारलिया मानसा । दर्पणु तो ॥
या गोष्टीचे सार इतकेच की, अर्जुन हा श्रीकृष्णाच्या मैत्रीचे घर होय किंवा सुखाने शृंगारलेले श्रीकृष्णाचे मन पाहण्याचा आरसाच होय.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -