घर संपादकीय वाणी संतांची वाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

ऐसेनि न राहतयातें राहवी । भ्रमतयातें बैसवी । थापटूनि चेववी । विरक्तीतें ॥
अशा रीतीने ज्याला त्या ठिकाणी राहण्याची इच्छा नाही, त्यालाही ती जागा राहवून घेते आणि फिरणारास बसवून घेते व वैराग्यास हालवून जागे करते.
हें राज्य वर सांडिजे । मग निवांता एथेंचि असिजे । ऐसें शृंगारियांहि उपजे । देखतखेंवों ॥
एखादा राजा किंवा विलासी पुरुष जरी असला, तरी त्यालाही ती जागा पाहताक्षणीच असे वाटावे की, आपले राज्य सोडून या ठिकाणी एकांतवासात रहावे.
जें येणेंमानें बरवंट । आणि तैसेंचि अतिचोखट । जेथ अधिष्ठान प्रगट । डोळां दिसे ॥
अशा प्रकाराने जे ठिकाण उत्तम आणि त्याचप्रमाणे अति शुद्ध, त्या ठिकाणी ब्रह्मानंद प्रत्यक्ष अनुभवास येतो.
आणिकही एक पहावें । जें साधकीं वसतें होआवें । आणि जनाचेनि पायरवें । रुळेचिना ॥
आणखी एक गोष्ट साधकाने पहावी; ती ही की, त्या ठिकाणी साधकाची वस्ती असून इतर मनुष्याची वर्दळ लागणार नाही.
जेथ अमृताचेनि पाडें । मुळाहीसकट गोडें । जोडती दाटें झाडें । सदा फळतीं ॥
त्या ठिकाणी अमृतासारखी मुळासुद्धा गोड व नेहमी फळांनी युक्त अशी दाट झाडे असावी;
पाउला पाउला उदकें। वर्षाकाळेंही अति चोखें । निर्झरें कां विशेखें । सुलभें जेथ ॥
तेथे पावलापावलावर पाण्याचे झरे असावे ते असे की, ज्याचे पाणी पावसाळ्यातही निर्मळ असते व ते पुष्कळ असून, उतरण्यास किंवा पाणी काढण्यास सोपे असावे.
हा आतपुही अळुमाळु । जाणिजे तरी शीतळु । पवनु अति निश्चळु । मंदु झुळके ॥
या ठिकाणी सूर्याचे ऊन सौम्य असावे आणि कदाचित ऊन स्वच्छ पडले तर त्यापासून ताप उत्पन्न होऊ नये. तसाच वारा मंद व शीतल वाहत असावा.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -