Eco friendly bappa Competition
घर संपादकीय वाणी संतांची वाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

एर्‍हवीं तरी दोन्ही तेव्हांचि मिळती । परी कुंडलिनी नावेक दुश्चित्त होती । ते तयांतें म्हणे परौती । तुम्हीचि कायसी एथें? ॥
प्राण व अपान वायु हे दोन्ही त्याच वेळेस एके ठिकाणी मिळालेले असतात; परंतु ती कुंडलिनी क्षणभर बावरी होऊन ‘तुम्ही माघारे जा, तुमचे काय काम?’ असे त्यांना म्हणते.

आइकें पार्थिव धातु आघवी । आरोगितां कांहीं नुरवी । आणि आपातें तंव ठेवी । पुसोनियां ॥
अर्जुना, ऐक. शरीरातील सर्व पृथ्वीचा भाग खाऊन टाकून काही शिल्लक ठेवीत नाही, तसाच उदकाचा भाग सर्व चाटून पुसून टाकिते.
ऐसी दोनी भूतें खाये । ते वेळीं संपूर्ण धाये । मग सौम्य होऊनि राहे । सुषुम्नेपाशीं ॥
अशा रीतीने दोन्ही भूताचा भाग खाऊन तृप्त झाल्यावर मग सौम्य होऊन स्वस्थपणे सुषुम्नानाडीपाशी राहते.
तेथ तृप्तीचेनि संतोषें । गरळ जें वमी मुखें । तेणें तियेचेनि पीयूषें । प्राणु जिये ॥
त्या ठिकाणी तृप्तीच्या भरात ती मुखातून जी गरळ ओकते, त्या गरळरूपी अमृताच्या योगाने प्राण रक्षण होतात.
तो अग्नि आंतूनि निघे । परि सबाह्य निववूंचि लागे । ते वेळीं कसु बांधिती आंगें । सांडिला पुढती ॥
तो गरळरूप अग्नि बाहेर निघतो खरा; परंतु सर्व अंगातील दाह शमवितो; त्यामुळे अंगातील पूर्वी गेलेले सामर्थ्य फिरून येऊ लागते,
मार्ग मोडिती नाडीचे । नवविधपण वायूचें । जाय म्हणौनि शरीराचे । धर्मु नाहीं ॥
नाडीचे वाहणे बंद होते व नऊ वायूचे व्यापार बंद होतात. म्हणून शरीराचे धर्म राहत नाहीत.
इडा पिंगळा एकवटती । गांठी तिन्ही सुटती । साही पदर फुटती । चक्रांचे हे ॥
इडा व पिंगळा या एक होतात, तिन्ही गाठी सुटतात आणि साही चक्राचे संबंध नाहीसे होतात.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -