घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

मग शशी आणि भानु । ऐसा कल्पिजे जो अनुमानु । तो वातीवरी पवनु । गिंवसितां न दिसे ॥
मग चंद्र आणि सूर्य अशी ज्या वायूला नावे आहेत तो दिव्याच्या उजेडाने बघू गेले असता दिसत नाही.
बुद्धीची पुळिका विरे । परिमळु घ्राणीं उरे । तोही शक्तीसवें संचरे । मध्यमेमाजीं ॥
बुद्धीची ज्ञानकळा जागचे जागी नाहीशी होते आणि नाकामध्ये उरलेला सुगंधही कुंडलिनीबरोबर सुषुम्नेत जातो.
तंव वरिलेकडोनि ढाळें । चंद्रामृताचें तळें । कानवडोनि मिळे । शक्तिमुखीं ॥
त्या वेळी भ्रुकुटीचक्रामध्ये जे चंद्रामृताचे तळे आहे, त्याला हळूच धक्का बसून ते वाकडे होते व त्यातील अमृत कुंडलिनीच्या मुखात पडू लागते.
तेणें नाळकें रस भरे । तो सर्वांगामाजीं संचरे । जेथिंचा तेथ मुरे । प्राणपवनु ॥
त्यामुळे तिच्यात रस भरून तो सर्वागात पसरतो आणि तो प्राणवायूने जिथल्या तिथेच मुरतो.
तातलिये मुसें । मेण निघोनि जाय जैसें । मग कोंदली राहे रसें । वोतलेनी ॥
तापलेल्या मुशीतील मेण नाहीसे होऊन ती ज्याप्रमाणे ओतलेल्या रसाने गच्च भरून राहते,
(मुशीचा आकार रसाला येतो,)
तैसें पिंडाचेनि आकारें । ते कळाचि कां अवतरे । वरी त्वचेचेनि पदरे । पांघुरली असे ॥
त्याचप्रमाणे, ते शरीर इतके तेजस्वी दिसते की, जणूकाय मूर्तिमंत तेजच त्या ठिकाणी अवतरले आहे!
जैशी आभाळाची बुंथी । करूनि राहे गभस्ती । मग फिटलिया दीप्ति । धरून ये ॥
सूर्य ढगाच्या बुरख्यात दडून राहिलेला असतो, परंतु तेच आभाळ नाहीसे झाल्यावर तो ज्याप्रमाणे आपले तेजाने वर येतो,
तैसा आहाचवरि कोरडा । त्वचेचा असे पातोडा । तो झडोनि जाय कोंडा । जैसा होय ॥
त्याचप्रमाणे, शरीरावर त्वचेचा जो उगाच पापुद्रा असतो, तो कोंड्याप्रमाणे निघून जातो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -