घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

हे रूपक परी असो। सांगों उघड जैसें परियेसों । तरी नामरूपाचा अतिसो। प्रकृतीच कीजे ॥
हे रूपक असो; तुला समजेल अशा उघड रीतीने सांगावयाचे म्हटले तर ही प्रकृतिच प्राण्यांच्या नामरूपाचा विस्तार करिते,
आणि प्रकृति तंव माझ्या ठायीं। बिंबे येथ आन नाहीं । म्हणौनि आदि मध्य अवसान पाहीं । जगासि मी ॥
आणि प्रकृति तर निःसंशय माझ्याच ठिकाणी खोटी भासते. ती माझ्याहून निराळी नाही; म्हणून जगाची उत्पत्ति, स्थिति आणि लय यास मीच कारण आहे.
हें रोहिणीचें जळ। तयाचें पाहतां येइजे मूळ। तैं रश्मि नव्हती केवळ । होय तें भानु ॥
हे दृश्य विश्व मृगजळासारखे आहे ! मृगजळाचे मूळ पाहू गेले असता ते केवळ सूर्यकिरण नसून सूर्यच होय;
तयाचिपरी किरीटी । इया प्रकृति जालिये सृष्टी । जैं उपसंहरूनि कीजेल ठी। तैं मीचि आहें ॥
त्याचप्रमाणे अर्जुना, ज्या प्रकृतीपासून ही सृष्टि झाली आहे, तिचा निरास (उपसंहार) करून तिच्या मुळाशी जो यावे तो अवशिष्ट तत्त्व मीच आहे.
ऐसें होय दिसे न दिसे। हें मजचि माजीं असे। मियां विश्व धरिजे जैसें। सूत्रें मणि ॥
अशा प्रकारे जे निर्माण होऊन दिसते व नाहीसे होते, ते माझ्याच ठिकाणी होते. ज्याप्रमाणे दोर्‍याने मणि धरलेले असतात, त्याप्रमाणे मी हे विश्व धरले आहे.
सुवर्णाचे मणी केले । ते सोनियाचे सुतीं वोविले। तैसें म्यां जग धरिलें। सबाह्याभ्यंतरीं ॥
सोन्याचे मणि करून ते सोन्याच्याच तारेत ओवावे, त्याप्रमाणे हे सर्व जग अंतर्बाह्य मीच व्यापले आहे.
म्हणोनि उदकीं रसु। कां पवनीं जो स्पर्शु। शशिसूर्यीं जो प्रकाशु । तो मीचि जाण ॥
म्हणून, पाण्यात जो रस आहे किंवा वार्‍यात जो स्पर्श आहे आणि चंद्र व सूर्य यांच्यात जो प्रकाश आहे, तो मीच आहे असे समज.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -