घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

तैसाचि नैसर्गिकु शुद्धु । मी पृथ्वीच्या ठायीं गंधु। गगनीं मी शब्दु । वेदीं प्रणवु ॥
त्याचप्रमाणे, पृथ्वीच्या ठिकाणी स्वभावतःच असणारा जो सुगंध, तो मी; आकाशात शब्द म्हणून जो आहे, तो मी; तसेच वेदात ॐकार म्हणून जो आहे, तो मी.
नराच्या ठायीं नरत्व। जें अहंभाविये सत्त्व। तें पौरुष मी हें तत्त्व। बोलिजत असे ॥
मनुष्याच्या ठिकाणी असणारा मनुष्यपणा जो अहंभावाचे सत्व आहे ते पौरुष मी हे तत्त्व तुला सांगून ठेवतो,
अग्नि ऐसें आहाच। तेज नामाचें आहे कवच । तें परातें केलिया साच। निजतेज तें मी ॥
तेजाला अग्नि या नावाचे जे उगीच पांघरूण आहे, ते दूर केले असता त्याचे खरे स्वरूप ते मी;
आणि नानाविध योनी । जन्मोनि भूतें त्रिभुवनीं । वर्तत आहाति जीवनीं। आपुलाल्या ॥
आणि या त्रिभुवनात प्राणी खूप प्रकारच्या जातीत जन्म घेऊन आपापल्या जातीच्या अनुरोधाने अन्नादि जीवनाने जगतात.
एकें पवनेंचि पिती । एकें तृणास्तव जिती। एकें अन्नाधारें राहती। जळें एकें ॥
कोणी वारा पिऊन असतात, कोणी गवतावर उपजीविका करितात, कोणी अन्नावर राहतात आणि कोणी पाण्यावर आपले उपजीवन करितात;
ऐसें भूतप्रति आनान । जें प्रकृतिवशें दिसे जीवन। तें आघवाठायीं । अभिन्न मीचि एक ॥
असे प्रत्येक प्राण्याचे त्याच्या प्रकृतीच्या मानाने जे निरनिराळे जीवन दिसते ते सर्व मीच आहे.
पै आदिचेनि अवसरें । विरूढे गगनाचेनि अंकुरें। जें अंतीं गिळी अक्षरें । प्रणवपीठींची ॥
खरोखर, उत्पत्तीचे वेळी जे आकाशाच्या अंकुराने विस्तार पावते, आणि जे अंतकाळी ॐकाराची अक्षरे गिळून टाकते.
जंव हा विश्वाकारु असे। तंव जें विश्वाचिसारिखें दिसे । मग महाप्रळयदशे। कैसेंहीं नव्हे ॥
जोपर्यंत या जगाला आकार आहे, तोपर्यत जे त्याच्यासारखेच दिसते, परंतु महाप्रलयाचे वेळेस ते कोणत्याही आकाराचे नसते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -