घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

ऐसें अनादि जें सहज । तें मी गा विश्वबीज । हें हातातळीं तुज । देइजत असें ॥
असे जे या जगाचे अनादि व स्वत:सिद्ध बीज ते मी आहे; ते आज अगदी तुझ्या हातात देत आहे.
मग उघड करूनि पांडवा । जैं हे आणिसील सांख्यांचिया गांवा । तैं ययाचा उपेगु बरवा । देखशील ॥
मग अर्जुना, ते समजून घेऊन जर तू त्याचा विचार करशील तर त्याचा किती चांगला उपयोग आहे, ते पाहशील.
परी हे अप्रासंगिक आलाप । आतां असतु न बोलों संक्षेप । जाण तपियांच्या ठायीं तप । तें रूप माझे ॥
परंतु आता हे अप्रासंगिक बोलणे बाजूला राहू दे. तुला मी थोडक्यात सांगतो, हे पहा तपस्व्याचे ठिकाणी तप म्हणून जे आहे, ते माझे रूप होय.
बळियांमाजीं बळ । ते मी जाणें अढळ । बुद्धिमंतीं केवळ । बुद्धि ते मी ॥
बलवानात बल म्हणून जे आहे, ते मी असे निःसंशय समज आणि बुद्धिमतात बुद्धि म्हणून जी आहे ती मी.
भूतांच्या ठायीं कामु । तो मी म्हणे आत्मारामु । जेणें अर्थास्तव धर्मु । थोरु होय ॥
श्रीकृष्ण म्हणतात :- ज्याच्या आचरणापासून धर्म व अर्थ हे पुरुषार्थ साध्य होतात, तो प्राणिमात्राचे ठिकाणी असणारा काम मी आहे.
एर्‍हवीं विकाराचेनि पैसे । करी कीर इंद्रियांचि ऐसें । परी धर्मासि वेखासें । जावों नेदी ॥
एर्‍हवी, विकाराच्या वाढीमुळे इंद्रियांच्या इच्छेप्रमाणे जे आचरण केले, तरी तो काम धर्माविरुद्ध जाऊ देत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -