घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

जो अप्रवृत्तीचा अव्हांटा । सांडूनि विधीचिया निघे वाटा । तेवींचि नियमाचा दिवटा । सवें चाले ॥
तो काम निषेधाची आडवाट सोडून विधीच्या वाटेने नीट जातो आणि त्याचप्रमाणे त्याच्या बरोबर नियमरूप मशाल पेटलेली असते.
कामु ऐशिया वोजा प्रवर्ते । म्हणोनि धर्मासि होय पुरतें । मोक्षतीर्थींचे मुक्तें । संसार भोगी ॥
अशा रीतीने हा काम चालतो, म्हणून धर्माचे आचरण पूर्ण होते, त्यामुळे संसारात राहणार्‍याला मोक्षरूपी तीर्थात मुक्ती प्राप्त होते.
जो श्रुतिगौरवाच्या मांडवीं । काम सृष्टीचा वेलु वाढवी । जंव कर्मफळेंसि पालवी । अपवर्गीं टेंके ॥
तो काम वेदानी गौरव केलेल्या कर्मरूपी मांडवावर कर्मफलाची पाने मोक्षाला लागत तोपर्यंत आपला वेल वाढवितो.
ऐसा नियुत कां कंदर्पु । जो भूतां या बीजरूपु । तो मी म्हणे बापु । योगियांचा ॥
योग्याचे जनक श्रीकृष्ण म्हणतात :- अशा नियमाने राहणारा व प्राणिमात्रास बीजभूत असा काम, तो मी आहे.
हें एकेक किती सांगावें । आतां वस्तुजातचि आघवें मजपासूनि जाणावें । विकारलें असे ॥
हे एकेक तुला कुठपर्यत सांगावे ! तर वस्तुमात्र म्हणून जे काही आहे, ते सर्व माझ्यापासून विस्तार पावले आहे, असे समज.
जे सात्त्विक हन भाव । कां रजतमादि सर्व । ते ममरूपसंभव । वोळखें तूं ॥
जे सात्विक किंवा राजसतामसादि विकार आहेत, ते सर्व माझ्या रूपापासूनच निर्माण झाले आहेत, असे समज.
हें जाले तरी माझ्या ठायीं । परी तयामाजीं मी नाहीं । जैसी स्वप्नींच्या डोहीं । जागृति न बुडे ॥
ते जरी माझ्यापासून झाले आहेत तरी मी त्यांच्यात नाही. ज्याप्रमाणे स्वप्नाच्या डोहात जागृति बुडत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -