घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

जैसी रसाचीच सुघट । बीजकणिका घनवट । परी तियेस्तव होय काष्ठ । अंकुरद्वारें ॥
[किंवा] ज्याप्रमाणे बी (दाणा) रसाने पूर्ण भरलेले असते व त्याचेपासून अंकुर फुटून लाकूड बनते;
मग तया काष्ठाच्या ठायीं । सांग पां बीजपण असे काईं ? । तैसा मी विकारीं नाहीं । जरी विकारला दिसे ॥
मग त्या लाकडाचे ठिकाणी बीज असते का सांग बरे ! त्याचप्रमाणे सात्विकादि सर्व विकार जरी माझ्यापासून उत्पन्न झाले आहेत, तरी त्यामध्ये मी नाही.
पैं गगनीं उपजे आभाळ । परी तेथ गगन नाहीं केवळ । अथवा आभाळीं होय सलिल । तेथ अभ्र नाहीं ॥
खरोखर, आकाशात जे ढग उत्पन्न होतात, त्यात शुद्ध आकाश नसते; किंवा ढगात जे पाणी असते, त्या पाण्यात ढग नसतात.
मग त्या उदकाचेनि आवेशें । प्रगटलें तेज जें लखलखीत दिसे । तिये विजूमाजीं असे । सलिल कायी? ॥
नंतर त्या पाण्याच्या घर्षणाने उत्पन्न होणारे तेज (वीज) जे चकचकीत दिसते. त्या तेजामध्ये पाणी असते काय?
सांगे अग्नीस्तव धूम होये । तिये धूमीं काय अग्नी आहे? । तैसा विकारु हा मी नोहें । जरी विकारला असे ॥
अग्नीपासून जो धूर उत्पन्न होतो, त्या धुरात अग्नी आहे का, सांग बरे? त्याप्रमाणे, सात्विकादि सर्व विकार जरी माझ्यापासून निर्माण झाले आहेत, तरी त्यात मी नाही.
परी उदकीं जाली बाबुळी । ते उदकातें जैसी झांकोळी । कां वायांचि आभाळीं । आकाश लोपे ॥
तथापि, जसे पाण्यापासून उत्पन्न झालेले गोंडाळ पाण्याला झाकून टाकते किंवा ढगाच्या योगाने आकाश व्यर्थ लोपले जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -