घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

येथें भूतें जियें अतीतलीं । तियें मीचि होऊनि ठेलीं । आणि वर्तत आहाति जेतुलीं । तींही मीचि ॥
या जगात जितके प्राणी होऊन गेले, त्यांचे ठायी मीच होतो आणि हल्ली आहेत, त्यातही मीच आहे.
कां भविष्यमाणें जियें हीं । तींहीं मजवेगळीं नाहीं । हा बोलचि एर्‍हवीं कांहीं । होय ना जाय ॥
किंवा पुढे होणार आहेत, तेही मजपासून वेगळे नाहीत; परंतु हे फक्त बोलणे आहे. बाकी काही होत नाही आणि काही जात नाही.
दोराचिया सापासी । डोंबा बडिया ना गव्हाळा ऐसी । संख्या न करवे कोण्हासी । तेवीं भूतांसि मिथ्यत्वें ॥
ज्याप्रमाणे दोरीच्या सापाविषयी तो काळा, कवड्या, गव्हाळा वैगेरे काहीच कल्पना करिता येत नाही, त्याप्रमाणे प्राणिमात्र मिथ्या असल्यामुळे तत्संबंधी कोणतीच कल्पना करता येत नाही.
ऐसा मी पंडुसुता । अनुस्यूतु सदा असतां । या संसार जो भूतां । तो आनें बोलें ॥
हे पंडुसुता, अशा प्रकारे मी सदा अखंड व्याप्त आहे. प्राणीमात्रांच्या मागे जो संसार लागला आहे, त्याचे कारण भिन्न आहे.
तरी तेचि आतां थोडीसी । गोठी सांगिजेल परियेसीं । पैं अहंकार तनूंसीं । वालभ पडिलें ॥
म्हणून त्याविषयी थोडीशी गोष्ट सांगतो ती ऐक; अभिमान व तनु (शरीर) या दोन्हीची प्रीती जडली,
तेय इच्छा हे कुमारी जाली । मग ते कामाचिया तारुण्या आली । तेथ द्वेषेंसी मांडिली । वर्‍हाडिक ॥
त्या दोघांच्या प्रीतीपासून इच्छारूप कन्या निर्माण झाली व ती आपल्या कामाच्या पूर्ण तारुण्यात आल्यावर तिचे द्वेषाशी लग्न लागले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -