Eco friendly bappa Competition
घर संपादकीय वाणी संतांची वाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

जैसें नामाचेनि अनारिसेपणें । एका पुरुषातें बोलावणें । कां दोहींमार्गीं जाणें । एकाचि ठाया ॥
जसे नावाच्या वेगळेपणाने एकाच पुरुषाला हाका मारणे किंवा एकाच ठिकाणाला दोन मार्गाने जाणे;
नातरी एकचि उदक सहजें । परि सिनाना घटीं भरिजे । तैसें भिन्नत्व जाणिजे । योगसंन्यासांचें ॥
किंवा एकच जल भांड्यात भरल्यावर पाण्याला जसा दुजा भाव नाही, तसा योग आणि संन्यास यात भेद नाही, असे जाण.
आइकें सकळ संमतें जगीं । अर्जुना गा तोचि योगी । जो कर्में करूनि रागी । नोहेचि फळीं ॥
अर्जुना, जो कर्मे करून त्यांच्या फलाची इच्छा धरीत नाही, तोच या जगतात सर्वांच्या बुद्धीने योगी असा समजला जातो.
जैसी मही हे उद्भिजें । जनी अहंबुद्धीवीण सहजें । आणि तेथिंचीं तियें बीजें । अपेक्षीना ॥
पृथ्वी ही वृक्षादिकांना उत्पन्न करून त्यांच्या उत्पत्तीबद्दल काही अहंकारबुद्धि दाखवीत नाही आणि त्यांच्यापासून उत्पन्न होणार्‍या फलाचीही ज्याप्रमाणे इच्छा करीत नाही,
तैसा अन्वयाचेनि आधारें । जातीचेनि अनुकारें । जें जेणें अवसरें । करणें पावे ॥
त्याचप्रमाणे, आत्मबोधाच्या आधाराने आणि जातीस अनुरूप असे जे कर्म ज्या वेळी करण्याचा प्रसंग येईल,
तें तैसेंचि उचित करी । परी साटोपु नोहे शरीरीं । आणि बुद्धिही करोनि फळवेरी । जायेचिना ॥
ते सर्व यथाविधि करून तो आपल्या शरीरात अहंकार उत्पन्न होऊ देत नाही आणि बुद्धिला फळाच्या आशेकडे जाऊ देत नाही.
ऐसा तोचि संन्यासी । पार्था गा परियेसीं । तोचि भरंवसेनिसीं । योगीश्वरु ॥
पार्था, ऐक. असा जो पुरुष, तोच संन्यासी आणि तोच निःसंशय योगीश्वर होय.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -