घर संपादकीय वाणी संतांची वाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

प्रवृत्ती माघौति मोहरे । समाधि ऐलाडि उतरे । आघवें अभ्यासु सरे । बैसतखेंवो ॥
त्या ठिकाणी कर्म करण्याची प्रवृत्ती मागे फिरून समाधी कडे येते. आसनावर बसल्यानंतर जणू काही सर्व अभ्यास संपून जातो.
मुद्रेची प्रौढी ऐशी । तेचि सांगिजेल आतां परियेसीं । तरी उरु या जघनासी । जडोनि घालीं ॥
आसनमुद्रेचे महत्व अशा प्रकारचे आहे. तेच आता सांगत आहे, तरी त्याचे श्रवण कर. पोटर्‍या मांड्यास लावून आसन घालावे.
चरणतळें देव्हडी । आधारद्रुमाचा बुडीं । सुघटितें गाढीं । संचरीं पां॥
दोन्ही पायांच्या टाचा वर कराव्यात आणि आधारचक्ररुपी वृक्षाच्या बुडाशी असलेल्या गुदस्थानाचे शिवणीपाशी दोन्ही टाचा घट्ट व स्थिर कराव्यात.
सव्य तो तळीं ठेविजे । तेणें सिवणीमध्यु पीडिजे । वरी बैसे तो सहजें । वामचरणु ॥
उजव्या पायाची टाच खाली घालावी व टाचेने शिवणीचा मध्यभाग दाबावा, म्हणजे उजव्या पायांवर स्वाभाविकच डावा पाय बसतो.
गुद मेंढ्राआंतौति । चारी अंगुळें निगुतीं । तेथ सार्ध सार्ध प्रांती । सांडुनियां ॥
गुद आणि शिश्न यामधील बरोबर जी चार बोटे जागा आहे त्यापैकी दीड बोटे खाली जागा सोडून.
माजि अंगुळ एक निगे । तेथ टांचेचेनि उत्तराभागें । नेहेटिजे वरि आंगें । पेललेनि ॥
मध्ये जी एकबोट जागा राहते, तेथे उजव्या पायाच्या टाचेच्या वरच्या बाजूने आपले अंग तोलून घट्ट दाबावे.
उचलिले कां नेणिजे । तैसें पृष्ठांत उचलिजे । गुल्फद्वय धरिजे । तेणेंचि मानें ॥
शरीर उचललेले न कळेल अशा तर्हेने पाठीचा खालचा भाग उचलावा आणि त्याच प्रकारे दोन्ही घोटे उचलून धरावेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -