घर संपादकीय वाणी संतांची वाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

मग शरीर संचु पार्था । अशेषुही सर्वथा । पार्ष्णीचा माथा । स्वयंभु होय ॥
अर्जुना ! मग हे शरीर घोटाच्या माथ्यावर आधाराशिवाय स्वतः सिद्ध राहते.
अर्जुना हें जाण । मूळबंधाचें लक्षण । वज्रासन गौण । नाम यासी॥
अर्जुना ! हे मूलबंधाचे लक्षण जाणून घे. याचेच वज्रासन असे गौण नाव आहे.
ऐसी आधारीं मुद्रा पडे । आणि आधींचा मार्गु मोडे । तेथ अपानु आंतलीकडे । वोहोंटो लागे ॥
अशा प्रकारे आधारचक्रावर (मुळंबन्ध बरोबर लागला) वज्रसनाची मुद्रा पडते आणि खालचा मार्ग बंद पडला म्हणजे अपानवायू आतल्या आत वर सरकू लागतो.
तंव करसंपुट आपैसें । वाम चरणीं बैसे । तंव बाहुमुळीं दिसे । थोरवी आली ॥
नंतर सहजच डाव्या पायावर दोन्ही हात द्रोणाकर करून ठेवाव्यात. त्यामुळे दोन्ही खांदे वर चढलेले दिसतात.
माजी उभारलेनि दंडें । शिरकमळ होय गाढें । नेत्रद्वारीची कवाडें । लागूं पहाती ॥
उंचावलेल्या दंडाकार खांद्यामुळे शिरकमल दोन्ही खांद्यात घट्ट राहते. मग डोळ्यांच्या पापण्या हळूहळू मिटू लागतात.
वरचिलें पाती ढळती । तळींची तळीं पुंजाळती । तेथ अर्धोन्मीलित स्थिती । उपजे तया ॥
वरची पापणी खाली येते व खालची पापणी खालीच विकसित होते. त्यावेळी डोळ्यांची अर्धी उघडलेली व अर्धी मिलेली अशी दृष्टी होते.
दिठी राहोनि आंतुलीकडे । बाहेर पाऊल घाली कोडें । ते ठायीं ठावो पडे । नासाग्रपीठीं ॥
दृष्टी ही आतल्याआत अंतर्मुख होऊनही स्वतःच्या इच्छेने बाहेर पाऊल टाकते आणि नाकाच्या शेंड्यावर स्थिर होते.
ऐसें आंतुच्या आंतुचि रचे । बाहेरी मागुतें न वचे । म्हणौनि राहणें आधिये दिठीचें । तेथेंचि होय ॥
अर्धोन्मीलित स्थितीमध्ये दृष्टी आतच राहते, ती पुनः बाहेर येत नाही; म्हणून अर्धीच दृष्टी नाकाच्या शेंड्याच्या ठिकाणी स्थिर राहते.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -