Eco friendly bappa Competition
घर संपादकीय वाणी संतांची वाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

आतां दिशांची भेटी घ्यावी । कां रूपाची वास पहावी । हे चाड सरे आघवी । आपैसया ॥
यामुळे, इतर दिशांकडे पहावे किंवा स्वरूप दृष्टीस पडेल म्हणून वाट पहावी ही इच्छा आपोआप नाहीशी होते.
मग कंठनाळ आटे । हनुवटी हडौती दाटे । ते गाढी होऊनी नेहटे । वक्ष:स्थळीं ॥
मग गळ्याची नळी आत झाकली जाते आणि हनुवटी गळ्याखालच्या खळगीला लागते व उरावर दृढ होऊन दाबून राहते.
माजी घंटिका लोपे । वरी बंधु जो आरोपे । तो जालंधरु म्हणिपे । पंडुकुमरा ॥
पंडुकुमरा, नंतर कंठमणि दिसेनासा होतो. अशा रीतीने जी मुद्रा बनते तिला जालंधरबंध असे म्हणतात.
नाभीवरी पोखे । उदर हें थोके । अंतरीं फांके । हृदयकोशु ॥
बेंबी वर फुगते, पोट सपाट होते व हृदयकोश अंतर्यामी पसरतो.
स्वाधिष्ठानावरिचिले कांठीं । नाभिस्थानातळवटीं । बंधु पडे किरीटी । वोढियाणा तो ॥
अर्जुना, गुदद्वारावरच्या भागावर आणि बेंबीच्या खालच्या भागामध्ये जी मुद्रा बनते तिला ओढियाणाबंध असे म्हणतात. अशा रीतीने शरीराच्या बाहेरील भागाने अभ्यासक्रम सुरू झाला,
ऐसी शरीराबाहेरलीकडे । अभ्यासाची पांखर पडे । तंव आंतु त्राय मोडे । मनोधर्माची ॥
म्हणजे आत मनाच्या धर्माचे बळ नाहीसे होते.
कल्पना निमे । प्रवृत्ती शमे । आंग मन विरमे । सावियाचि ॥
(ते मनोधर्म कोणते, ते ऐक.) कल्पना खुंटते, मनाची हाव कमी होते आणि मनोविकार आपोआप बंद पडतात.
क्षुधा काय जाहाली । निद्रा केउती गेली । हे आठवणही हारपली । न दिसे वेगां ॥
भूक काय झाली व झोप कुठे गेली यांची आठवण नाहीशी होऊन त्यांचा पत्तादेखील लागत नाही.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -