Eco friendly bappa Competition
घर संपादकीय वाणी संतांची वाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

जो मूळबंधें कोंडला । अपानु माघौता मुरडला । तो सवेंचि वरी सांकडला धरी फुगूं ॥
मूलबंधाने कोंडलेला अपानवायु माघारी फिरला म्हणजे सहज वर अडकून फुगा धरतो.
क्षोभलेपणें माजे । उवाइला ठायीं गाजे । मणिपूरेंसीं झुंजे । राहोनियां ॥
तो क्षोभून बलवत्तर होतो व अडकलेल्या जागी गुरगुरतो आणि राहून राहून लिंगचक्राशी धडका मारितो.
मग थावलिये वाहटुळी । सैंघ घेऊनि घर डहुळी । बाळपणींची कुहीटुळी । बाहेर घाली ॥
मग अशारीतीने माजलेली वावटळ चोहोकडे पोटात फिरून ढवळाढवळ करिते आणि बालपणापासून साचलेली कुजकी घाण बाहेर काढण्याचा प्रयत्न करिते.
भीतरीं वळी न धरे । कोठ्यामाजीं संचरे । कफपित्ताचे थारे । उरों नेदी ॥
तो वायु पोटात तळाशी न मुरडता कोठ्यात शिरतो आणि कफपित्ताचा नाश करितो.
धातूंचे समुद्र उलंडी । मेदाचे पर्वत फोडी । आंतली मज्जा काढी । अस्थिगत ॥
सप्त धातूंची स्थाने ओलांडतो, मेदाचे डोंगर फोडतो आणि हाडातील रस बाहेर काढतो.
नाडीतें सोडवी । गात्रांतें बिघडवी । साधकातें भेडसावी । परि बिहावें ना ॥
नाड्या सोडवितो, अवयवांना शिथिल करितो आणि योगसाधन करणार्‍याला भीती घालतो; परंतु त्याने भिऊ नये.
व्याधीतें दावी । सवेंचि हरवी । आप पृथ्वी कालवी । एकवाट ॥
तो व्याधी उत्पन्न करितो आणि लागलीच नाहीशी करितो व कफ वगैरे ओलसर पदार्थ आणि मांस वगैरे जड पदार्थ एकत्र करितो.
तंव येरीकडे धनुर्धरा । आसनाचा उबारा । शक्ती करी उजगरा । कुंडलिनीतें ॥
अर्जुना, दुसरीकडे काय प्रकार होतो म्हणशील, तर आसनाच्या उष्णतेने कुंडलिनी नावाची शक्ती जागी होते.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -