Eco friendly bappa Competition
घर संपादकीय वाणी संतांची वाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

नागिणीचें पिलें । कुंकुमें नाहलें । वळण घेऊनि आलें । सेजे जैसें ॥
नागिणीचे पिल्लू कुंकवाने नाहालेले जसे वेटोळे करून निजते,
तैशी ते कुंडलिनी । मोटकी औट वळणी । अधोमुख सर्पिणी । निदेली असे ॥
त्याचप्रमाणे ती कुंडलिनी लहानसे साडेतीन वेढे घालून खाली तोंड करून सर्पाप्रमाणे निजलेली असते.
विद्युल्लतेची विडी । वन्हिज्वाळांची घडी । पंधरेयाची चोखडी । घोंटीव जैशी ॥
ती विजेच्या कंकणाप्रमाणे किंवा अग्निज्वलेच्या घडीप्रमाणे अथवा घोटून चकचकीत केलेल्या सोन्याच्या वेढ्याप्रमाणे,
तैशी सुबद्ध आटली । पुटीं होती दाटली । तें वज्रासनें चिमुटली । सावधु होय ॥
नाभिस्कंदात जी दाटून बदलेली असते, ती मूळबंधाच्या चिमट्याने जागी होते.
तेथ नक्षत्र जैसें उलंडलें । कीं सूर्याचें आसन मोडलें । तेजाचें बीज विरूढलें । अंकुरेंशीं ॥
तेव्हा नक्षत्र तुटून पडते वेळी जसे चकाकते किंवा सूर्याचे आसन ढळावे अथवा तेजाचे बी पेरून त्याला जसा अंकूर यावा,
तैशी वेढियातें सोडिती । कवतिकें आंग मोडिती । कंदावरी शक्ती । उठली दिसे ॥
त्याप्रमाणे ती कुंडलिनी आपले वेढे सोडून कौतुकाने आळस देऊन नाभीवर उभी राहिलेली दिसते.
सहजें बहुतां दिवसांची भूक । वरि चेवविली तें होय मिष । मग आवेशें पसरी मुख । ऊर्ध्वा उजू ॥
आधीच फार दिवसांची भूकेलेली, त्यात तिला जागे केल्याचे निमित्त झाल्यामुळे मग आवेशाने तोंड उघडून ती वर नीट उभी राहते.
तेथ हृदयकोशातळवटीं । जो पवनु भरे किरीटी । तया सगळेयाचि मिठी । देऊनि घाली ॥
किरिटी, तेव्हा हृदयकमलाच्या खाली जो वारा भरलेला असतो, त्या सगळ्याला ती कवटाळून मिठी घालते.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -