घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

अहंकाराचिया चळिया । वरि मदत्रयाचिया उकळिया । जेथ विषयोर्मीच्या आकळिया । उल्लाळ घेती ॥
अहंकाररूपी ओघाने व विद्या, धन आणि सामर्थ्य या तीन मदांच्या उकळ्यांना ज्या ठिकाणी विषयतरंगाच्या लाटा उसळत आहेत;
उदयास्ताचे लोंढे । पाडीत जन्ममरणाचे चोंढे । जेथ पांचभौतिक बुडबुडे । होती जाती ॥
उदय आणि अस्त यांच्या पुराने जन्ममरणाचे धोंडे पडून त्या ठिकाणी शरीररूप बुडबुडे निर्माण होतात व लय पावतात;
सम्मोह विभ्रम मासे । गिळिताती । धैर्याचीं आविसें । तेथ देव्हडे भोंवत वळसे अज्ञानाचे ॥
जिच्यात मोह व भ्रांति हे मासे धैर्य धरून मांस गिळून टाकतात; त्या ठिकाणी अज्ञानरूपी मोठे भोवरे फिरत असतात;
भ्रांतीचेनि खडुळें । रेवले आस्थेचे अवगाळें । रजोगुणाचेनि खळाळें । स्वर्गु गाजे ॥
भ्रांतिरूप गढूळ पाण्याने आस्थारूप गाळात रुतून रजोगुणाच्या खळखळाटाने स्वर्गप्राप्तीची गर्जना होत असते;
तमाचे धारसे वाड । सत्त्वाचें स्थिरपण जाड । किंबहुना हे दुवाड । मायानदी ॥
त्याचप्रमाणे तमोरूपी प्रवाह व सत्त्वरूपी स्थिर पाण्याचा डोह तरून जाण्यास कठीण आहे. फार काय सांगावे, ही मायानदी फार घातुक आहे.
पैं पुनरावृत्तीचेनि उभडें । झळंबती सत्यलोकींचे हुडे । घायें गडबडती धोंडे । ब्रह्मगोळकाचे ॥
खरोखर ही मधील जन्ममृत्यूंच्या पुराच्या लोंढ्यात सत्यलोकीचे किल्ले वाहून जातात आणि ब्रह्मांडरूप धोंडे तेव्हाच गडगडत जातात.
तया पाणियाचेनि वहिलेपणें । अझुनी न धरिती वोभाणें । ऐसा मायापुर हा कवणें । तरिजेल गा? ॥
त्या पुराचा प्रवाह अजून ओसरत नाही! अरे, असा हा मायापूर कोणाच्याने तरून जाईल?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -