घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

जेथ उंचावलेनि पवाडें । सुखाचा पैसारु जोडे । आपुलेनि सुरवाडें । उडों ये ऐसा ॥
त्या चिदाकाशात, आपण कितीही उंच उडण्याचे मनात आणले तरी त्यात आपल्या इच्छेप्रमाणे अनायासाने सुखाने उडण्यास अवकाश आहे.
तया उपमा माप कां सुवावें । मज अव्यक्ता व्यक्त कां मानावें । सिद्ध असतां कां निमावें । साधनवरी ॥
त्या मला न मोजता येणार्‍याला मापात का घालावे? मज निराकाराला साकार का मानावे? मी सिद्ध असता माझ्या प्राप्तीकरिता साधनाने का शिणावे?
परी हा बोल आघवा । जरी विचारीजतसे पांडवा । तरी विशेषें या जीवां । न चोजवेगा ॥
पण अर्जुना, खरेच विचार केला तर हे माझे वरील बोलणे जीवांना बहुतकरून आवडत नाही.
कां जे योगमायापडळें । हे जाले आहाती आंधळे । म्हणौनि प्रकाशाचेनि देहबळें । न देखती मातें ॥
का की, योगमायेच्या पडद्याने जे अंध झालेले असतात, म्हणून देहबुद्धीच्या बळाने, प्रकाशरूप जो मी त्या मला पाहत नाहीत.
एर्‍हवीं मी नसें ऐसें । काय वस्तुजात असे? । पाहें पां कवण जळरसें । रहित आहे? ॥
एर्‍हवी मी नाही, अशी एक तरी वस्तू आहे का? पहा की, कोणतेही पाणी रसविरहित आहे का?
पवनु कवणातें न शिवेचि । आकाश कें न समायेचि । हें असो एकु मीचि । विश्वीं आहें ॥
वारा कोणाला स्पर्श करीत नाही? आकाश कोठे सामावत नाही? हे असो; अवघ्या विश्वात मीच भरलेला आहे.
येथें भूतें जियें अतीतलीं । तियें मीचि होऊनि ठेलीं । आणि वर्तत आहाति जेतुलीं । तींही मीचि ||
या जगात जितके प्राणी होऊन गेले, त्यांचे ठायी मीच होतो आणि हल्ली आहेत, त्यातही मीच आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -