Homeसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

तया दोघांस्तव जन्मला । ऐसा द्वंद्वमोहो जाला । मग तो आजेयानें वाढविला । अहंकारें ॥
त्या दोघांपासून (सुखदुःखरूप) द्वंद्वमोह हा पुत्र झाला. नंतर त्याच्या अहंकार आजोबांनी त्याला वाढविले.
जो धृतीसी सदां प्रतिकुळु । नियमाही नागवे सळु । आशारसें दोंदिलु । जाला सांता ॥
जो द्वंद्वमोह नेहमी धैर्याला प्रतिकूल व इंद्रियदमनाला द्वेषामुळे आकलन होत नाही, कारण तो आशारूप दुधाने पुष्ट झालेला आहे.
असंतुष्टीचिया मदिरा । मत्त होऊनि धनुर्धरा । विषयांचे वोवरां । विकृतीशीं ॥
हे धनुर्धरा, असंतोषरूप मद्याने उन्मत्त झाल्यामुळे तो विषयांच्या खोलीत उपभोग घेतो, त्रास मानीत नाही.
तेणें भावशुद्धीचिये वाटे । विखुरले विकल्पाचे कांटे । मग चिरिले आव्हांटे । अप्रवृत्तीचे ॥
त्याने शुद्ध भक्तीच्या वाटेवर विकल्पाचे काटे पसरून मग कुमार्गाच्या आडवाटा काढिल्या आहेत.
तेणें भूतें भांबावलीं । म्हणौनि संसाराचिया आडवामाजीं पडिलीं । मग महादु:खाच्या घेतलीं । दांडे वरी ॥
त्यायोगाने प्राणिमात्र भ्रम पावून संसाररूप अरण्यात पडतात व त्यांना महादु:खाचे रपाटे सोसावे लागतात.
ऐसे विकल्पाचे वांयाणे । कांटे देखोनि सणाणे । जे मतिभ्रमाचे पासावणें । घेतीचिना ॥
याप्रमाणे विकल्पाचे तीक्ष्ण परंतु निष्फल काटे पाहून ज्यापासून मतिभ्रमाचे पाश उत्पन्न होतात त्यांना जे मानीत नाहीत;
उजू एकनिष्ठेच्या पाउलीं । रगडूनि विकल्पाचिया भालीं । महापातकांची सांडिली । अटवीं जिहीं ॥
भक्तीच्या एकनिष्ठेच्या पावलांनी जे नीट जाताना विकल्पाचे भाल्यासारखे काटे चिरडून टाकतात, ते महापातकाचे जंगल टाळून सरळ मार्गाने जातात;
मग पुण्याचे धावा घेतले । आणि माझी जवळीक पातले । किंबहुना ते चुकले । वाटवधेयां ॥
नंतर पुण्याच्या मार्गाने धूम ठोकून माझे सानिध्य पावतात आणि अशारीतीने वाटमार्‍यांच्या (कामक्रोधादिकांच्या) हातून सुटतात!