घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

अहो हिमकरासी विंजणें । कीं नादापुढें आइकवणें । लेणियासी लेणें । हें कहीं आथी? ॥
अहो, ज्याचे किरण शीतल आहेत, अशा चंद्राला पंख्याने वारा घालणे किंवा सुस्वराला गायन ऐकविणे तसेच दागिन्याला अलंकार घालणे असे कोठे होईल का?
सांगा परिमळें काय तुरंबावे? । सागरें कवणे ठायीं नाहावें? । हें गगनचि आडे आघवें । ऐसा पवाडु कैंचा? ॥
सुगंधाने कशाचा वास घ्यावा? सागराने कशात नाहावे? आणि हे आकाश ज्यात मावेल अशी मोठी वस्तू कोणती आहे, सांगा बरे?
तैसें तुमचें अवधान धाये । आणि तुम्ही म्हणा हें होये । ऐसें वक्तृत्व कवणा आहे । जेणें रिझा तुम्ही? ॥
त्याचप्रमाणे तुमचे अवधान तृप्त होईल आणि तुम्ही असे म्हणाल की,‘वा! उत्तम व्याख्यान झाले!’ असे तुम्हाला तृप्त करण्याजोगे वक्तृत्व कोणाचे आहे?
तरि विश्वप्रगटितिया गभस्ती । काय हातिवेन न कीजे आरती? । कां चुळोदकें आपांपती । अर्घ्यु नेदिजे? ॥
तथापि, असा जरी न्याय आहे तरी भक्तीने अशा गोष्टी घडतात असे दृष्टान्तपूर्वक महाराज, सांगतात – म्हणून सर्व जग प्रकाशमय करणार्‍या सूर्याला काडवातीने आरती करू नये की काय? किंवा वरुणाला चुळकाभर पाण्याने अर्घ्य देऊ नये का?
प्रभु तुम्ही महेशाचिया मूर्ती । आणि मी दुबळा अर्चितुसें भक्ती । म्हणौनि बोल जर्‍ही गंगावती । तर्‍ही स्वीकाराल कीं ॥
महाराज, तुम्ही केवळ शंकराची मूर्ती आहात आणि मी गरीब तुमची भक्तीने पूजा करीत आहे, म्हणून बोलाच्या ऐवजी माझ्या बोलरूपी निर्गुडीचाही तुम्ही स्वीकर कराल!
बाळक बापाचिये ताटीं रिगे । आणि बापातेंचि जेवऊं लागे । कीं तो संतोषलेनि वेगें । मुखचि वोढवी ॥
लहान मूल बापाच्या ताटात जेवायला बसून आपली योग्यता नसतानाही प्रेमाने बापालाच घास देऊ लागते, तेव्हा तो संतोषभराने आपले तोंड घास घेण्याकरिता पुढे करतोच.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -