घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

कां बीजचि जाहलें तरु । अथवा भांगारचि अळंकारु । तैसा मज एकाचा विस्तारु । तें हें जग ॥
अथवा बीजच झाड झाले किंवा सोनेच अलंकार बनले, त्याप्रमाणे हे जग म्हणजे माझ्या एकाचाच विस्तार आहे.
हें अव्यक्तपणें थिजलें । तेंचि मग विश्वाकारें वोथिजलें । तैसें अमूर्तमूर्ति मियां विस्तारलें । त्रैलोक्य जाणें ॥
हे अव्यक्तपणाने थिजलेले (संकोचित) असते, तेच मग विश्वाच्या आकाराने पातळ होते (पसरते). या रीतीने अव्यक्तरूप असलेला मी त्रैलोक्याच्या रूपाने विस्तार पावतो असे समज.
महदादि देहांतें । इयें अशेषेंही भूतें । परी माझ्या ठायीं बिंबतें । जैसें जळीं फेण ॥
पाण्यावर जसा फेस भासतो, त्याप्रमाणे महतत्त्वापासून देहापर्यंत ही सर्वही भूते माझ्या ठिकाणी भासतात.
परि तया फेणांआंतु पाहतां । जेवीं जळ न दिसे पंडुसुता । नातरी स्वप्नींची अनेकता । चेइलिया नोहिजे ॥
अर्जुना, पण त्या फेसाच्या आत पाहिले असता जसे पाणी दिसत नाही, अथवा स्वप्नातील अनेकपण जसे जागे झाल्यावर नसते.
तैसीं भूतें इयें माझ्या ठायीं । बिंबती तयांमाजीं मी नाहीं । इया उपपत्ती तुज पाहीं । सांगितलिया मागां ॥
त्याप्रमाणे ही भूते माझ्या ठिकाणी जरी भासली तरी पण त्यामध्ये मी नाही. हा विचार तुला आम्ही मागे सांगितला आहे,
तो लक्षात आण.
म्हणौनि बोलिलिया बोलाचा अतिसो । न कीजे यालागीं हें असो । परी मज आंत पैसो । दिठी तुझी ॥
येवढ्याकरिता बोललेल्याच गोष्टींचा विस्तार करू नये, म्हणून हे बोलणे राहू दे, तर माझ्या स्वरूपात तुझी दृष्टी प्रवेश करो.
आमुचा प्रकृतीपैलीकडील भावो । जरी कल्पनेवीण लागसी पाहों । तरी मजमाजीं भूतें हेंही वावो । जें मी सर्व म्हणौनी ॥
मायेच्या पलीकडे असणारी जी आमची शुद्धस्वरूप स्थिती, ती जर तू कल्पना टाकून पहशील तर हे सर्व प्राणी माझ्या ठिकाणी आहेत हे म्हणणेदेखील व्यर्थ आहे. कारण सर्व मीच आहे म्हणून.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -