घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

हा एकचि अभिप्रावो पुढतपुढती । काय सांगों बहुतां उपपत्ती । येथ एकहेळां सुभद्रापती । येतुलें जाण पां ॥
हा एकच अभिप्राय खरा आहे. पुन: पुनः पुष्कळ पर्यायांनी काय सांगू! तर हे सुभद्रापती, एकदा एवढे लक्षात ठेव.
जे लोकचेष्टां समस्तां । जैसा निमित्तमात्र कां सविता । तैसा जगत्प्रभवीं पंडुसुता । हेतु मी जाणें ॥
अर्जुना, सर्व सृष्टीतील लोकांच्या व्यापारास ज्याप्रमाणे सूर्य हा केवळ कारणीभूत आहे, त्याप्रमाणे जगाच्या उत्पत्तीला मी कारण आहे, असे जाण.
कां जे मियां अधिष्ठिलिया प्रकृती । होती चराचराचिया संभूती । म्हणोनि मी हेतु हे उपपत्ती । घडे यया ॥
का की, ज्या वेळी मी मायेचा अंगिकार करितो, त्या वेळी तिच्या योगाने प्राणिमात्राची उत्पत्ती होते; म्हणून या जगाच्या उत्पत्तीचे कारण मी, अशी लोकांची समजूत आहे.
आतां येणें उजिवडें निरुतें । न्याहाळीं पां ऐश्वर्ययोगातें । जे माझ्या ठायीं भूतें । परी भूतीं मी नसें ॥
तेव्हा माझ्यापासून भूतांची उत्पत्ती जरी होते, तरी भूतात मी नाही, ही माझी अद्भुत करणी या ज्ञानाच्या उजेडाने नीट न्याहाळून पाहा.
अथवा भूतें ना माझ्या ठायीं । आणि भूतांमाजि मी नाहीं । या खुणा तूं कहीं । चुकों नको ॥
अथवा प्राणी माझ्या ठिकाणी नाही व मी त्यांच्या ठिकाणी नाही हे मुख्य वर्म तू कधीही विसरू नको.
हें सर्वस्व आमुचें गूढ । परि दाविलें तुज उघड । आतां इंद्रियां देऊनि कवाड । हृदयीं भोगीं ॥
हे माझे मुख्य वर्म तुला उघड करून दाखविले आहे. तर आता तू आपल्या इंद्रियांची दारे बंद करून म्हणजे विषयभोग बंद करून त्यांना कळू न देता आपल्या हृदयात याचा उपभोग घे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -